Ayodhya : अयोध्येत मंदिर, मठ आणि धार्मिक स्थळांवर यापुढे कर नाही; योगी सरकारचा निर्णय
Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नगर निगमला मठ, मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर कर आकारणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
अयोध्या: अयोध्येमध्ये आता मंदिरं, मठ आणि धार्मिक स्थळांना व्यावसायिक कर भरावा लागणार नाही. तशा प्रकारचा आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या नगर निगमला (Ayodhya Nagar Nigam) तशा प्रकारचे आदेश दिले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतले.
अयोध्या नगर निगमची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणच्या मंदिरांना, मठांना आणि इतर धार्मिक स्थळांना व्यावसायिक कर लावण्यात आला होता. त्यातून लाखो रुपयांचा महसूल मिळायला सुरुवात झाली. यावरुन तिथल्या मंदिरांच्या आणि मठांच्या प्रमुखांनी हा कर रद्द करावा अशी अनेकदा मागणी केली होती. आता हा कर रद्द करण्याचा आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिल्याने यापुढे मठ, मंदिरे आणि धार्मिक स्थळांना व्यावसायिक कर भरावा लागणार नाही.
मुख्ममंत्रीपदाची दुसऱ्यांदा सूत्रं हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच अयोध्येला भेट दिली. त्यांनी ऐतिहासिक हनुमानगढी आणि श्री राम जन्मभूमीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्याच रामनवमीच्या उत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच मठ आणि मंदिरांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतली. यावेळी अयोध्या नगरीच्या विकासासाठी आणखी काय करता येईल यावरही चर्चा केली.
मुख्ममंत्र्यांच्या या बैठकीमध्ये अयोध्या नगर निगमचे उच्च अधिकारीही उपस्थित होते. यामध्ये मंदिरं, मठ आणि धार्मिक स्थळांवर जो व्यावसायिक कर लावण्यात येत होता तो रद्द करण्याचा आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिला.
अयोध्येतील रामनवमी धडाक्यात साजरी करा; योगींचे आदेश
अयोध्येतील भूमीपूजन म्हणजे शिलान्यास झाल्यानंतर साजरी होणारी यंदाची रामनवमी ही पहिलीच रामनवमी असेल. त्यामुळे ही रामनवमी धडाक्यात साजरी करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. या रामनवमीचे नियोजन कसे करायचे या संदर्भात त्यांनी अधिकारी आणि मंदिरांचे प्रमुख यांची बैठक घेतली.
महत्त्वाच्या बातम्या:
- UP Cabinet : योगी सरकार 2.0, उत्तर प्रदेश सरकारचे खातेवाटप, जाणून घ्या कोणाला मिळालं कोणतं मंत्रिपद?
- मॉब लिंचिंगमध्ये बळी पडलेल्या मुस्लिम तरुणाच्या नातेवाईकांना मिळणार 2 लाखांची भरपाई, योगींची घोषणा
- VIDEO: विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यांची भेट, हातमिळवणी करत केलं हस्तांदोलन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
ABP Majha