एक्स्प्लोर

Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी विलक्षण पर्वणी! भव्य राम मंदिर निर्माणानंतरची पहिलीच रामनवमी, अयोध्येत जोरदार तयारी

Ram Navmi in Ayodhya : कारण, रामलला मंदिरात विराजमान झाल्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी. त्यासाठी अयोध्या राम मंदिरात खास तयारीही करण्यात येत आहे.

मुंबई : प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत (Ayodhya) भव्य-दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा संपन्न झाला, त्याला आता तीन महिने उलटले आणि अशातच आता रामनवमीची चाहुल लागली आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी (Ram Navami) आहे. त्यामुळे, या सोहळ्याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. 

भव्य राम मंदिर निर्माणानंतरची पहिलीच रामनवमी

रस्तोरस्ती रांगोळ्यांचा सडा, रंगबरिरंगी फुलांची सजावट, डोळे दिपवून टाकेल अशी रोषणाई, लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघालेला आसमंत, तेवत असलेल्या लाखो पणत्यांच्या प्रकाशाने सजीवपणा पांघरलेला शरयूतीर, मनमोहक फुलांच्या सजावटीने सजून बसलेली राम मंदिराची प्रत्येक भिंत अन् रामनामात चिंब भिजलेली लाखो रामभक्तांची मांदियाळी. 

रामभक्तांसाठी विलक्षण पर्वणी

22 जानेवारी 2024 रोजी पुण्यपावन देवभूमीत अर्थात अयोध्यानगरीत डोळ्यांचं पारण फेडेल असा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडला. जगभरातील लाखो भविकांनी याचि देही, याचि डोळा पाहिला. अशाच, अगदी अशाच सोहळ्याची अनुभूती पुन्हा एकदा येणार आहे. येत्या रामनवमीला 17 एप्रिल 2014 रोजी तब्बल 500 वर्षांच्या वनवासानंतर रामलला भव्यदिव्य अशा मंदिरात विसावले. त्यानंतर येणारी ही पहिली रामनवमी. 

यंदाची रामनवमी खास 

खरंतर रामनवमी आपण दरवर्षी भक्तिभावाने साजरी करतो. मात्र यंदाची रामनवमी खास असणार आहे. कारण, रामलला मंदिरात विराजमान झाल्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी. त्यासाठी खास तयारीही करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या कपाळावर रामनवमीच्या अभिजीत अभिजित मुहूर्तावर सूर्याची किरणे पडतील तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभूरामाचा राजतिलक होणार आहे. त्यासाठीची ट्रायलही करण्यात आली आहे.

जगभरातून रामभक्त अयोध्येत दाखल

प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच ही रामनवमी प्रचंड उत्साहात साजरी होणार आहे. म्हणूनच, सात्विकतेचा हा महन्मंगल सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी भारतासह जगभरातून रामभक्त अयोध्येत धावून येणार आहेत.

रामनवमीला अयोध्या नगरी फुलणार

  • अयोध्येत तब्बल 50 लाख भाविक येण्याची शक्यता
  • भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी
  • भाविकांच्या निवास, भोजनासाठी खास सुविधा असणार
  • भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी
  • परदेशी भाविकांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार
  • सुरक्षेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथकं तैनात असणार
  • शरयू नदीत सहा फायबर बोट तैनात 

रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी

जगभरातील रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी असणार आहे. मर्यादा, संस्कती, परंपरा, सात्विकता, संयम  आणि शौर्याचा अवतार असलेल्या प्रभू रामाच्या जन्माचा अर्थात रामनवमीचा हा सोहळा 
अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे. त्यामुळे, प्रभू रामाच्या भक्तीच्या आनंद लहरींनी भवताल व्यापून जाणार आहे, एवढं नक्की.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरकडून पहिल्यांदा सून सानिया चांडोकसह फोटो शेअर, लेक सारा अन् अंजली तेंडुलकर देखील सोबत
सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदा शेअर केला सून सानिया चांडोकसह फोटो, लेक अन् पत्नी देखील सोबत
Pune News : पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आरखडा जाहीर, 41 प्रभाग ,165 नगरसेवक, हरकती मागवल्या
पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आरखडा जाहीर, 41 प्रभाग ,165 नगरसेवक, हरकती मागवल्या
होय, मतदान यादीत आमचं नाव दोनदा, पण..; इंद्रजीत चव्हाणांचा मुख्यमंत्र्‍यांसह भाजपवर पलटवार
होय, मतदान यादीत आमचं नाव दोनदा, पण..; इंद्रजीत चव्हाणांचा मुख्यमंत्र्‍यांसह भाजपवर पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरकडून पहिल्यांदा सून सानिया चांडोकसह फोटो शेअर, लेक सारा अन् अंजली तेंडुलकर देखील सोबत
सचिन तेंडुलकरनं पहिल्यांदा शेअर केला सून सानिया चांडोकसह फोटो, लेक अन् पत्नी देखील सोबत
Pune News : पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आरखडा जाहीर, 41 प्रभाग ,165 नगरसेवक, हरकती मागवल्या
पुणे महापालिकेच्या वॉर्ड रचनेचा प्रारुप आरखडा जाहीर, 41 प्रभाग ,165 नगरसेवक, हरकती मागवल्या
होय, मतदान यादीत आमचं नाव दोनदा, पण..; इंद्रजीत चव्हाणांचा मुख्यमंत्र्‍यांसह भाजपवर पलटवार
होय, मतदान यादीत आमचं नाव दोनदा, पण..; इंद्रजीत चव्हाणांचा मुख्यमंत्र्‍यांसह भाजपवर पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
कुठे काळा पोळा, कुठे कर्जमाफीचा मुद्दा; बैलपोळ्याला सर्जा-राजावर झळकला 'चलो मुंबई'चा नारा
कुठे काळा पोळा, कुठे कर्जमाफीचा मुद्दा; बैलपोळ्याला सर्जा-राजावर झळकला 'चलो मुंबई'चा नारा
जे लोक खड्ड्यांवरून आंदोलन करतात त्यांच्याकडे कोणतही काम राहिलेलं नाही : मंगलप्रभात लोढा
जे लोक खड्ड्यांवरून आंदोलन करतात त्यांच्याकडे कोणतही काम राहिलेलं नाही : मंगलप्रभात लोढा
राज्यातील महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून 'निवडणूक' कामाला वेग
राज्यातील महापालिकांची प्रभागरचना सोमवारी प्रसिद्ध होणार; राज्य आयोगाकडून 'निवडणूक' कामाला वेग
मोठी बातमी : बीडमध्ये कोर्टात आत्महत्या केलेल्या वकील प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, न्यायाधीशावरच गुन्हा, पोलिसांकडून शोध सुरु
मोठी बातमी : बीडमध्ये कोर्टात आत्महत्या केलेल्या वकील प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट, न्यायाधीशावरच गुन्हा, पोलिसांकडून शोध सुरु
Embed widget