एक्स्प्लोर

Ayodhya MP Awadhesh Prasad : अयोध्येच्या खासदाराने पत्रकार परिषदेत टाहो फोडला VIDEO

Ayodhya MP Awadhesh Prasad : अयोध्येच्या खासदाराने पत्रकार परिषदेत टाहो फोडला VIDEO

Ayodhya MP Awadhesh Prasad : अयोध्येत एका दलित मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. अयोध्येतील मिल्किपूर मतदारसंघात काही दिवसांत मतदान होणार असतानाच ही अत्याचाराची घटना समोर आलीये. दलित युवतीचे शव भयावह स्थितीत आढळून आले आहेत. तिचे दोन्ही डोळे काढून टाकण्यात आले आहेत. शिवाय, शरिरावर देखील अनेक जखमी असल्याचे समोर असून अनेक हाडेही मोडलेल्या स्थितीत आहेत. दरम्यान, या घटनेवर भाष्य करत असताना अयोध्येचे समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांना अश्रू अनावर झाले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत टाहो फोडलाय. 

आता आम्ही देशापुढे जाऊन काय बोलणार? : अवधेश प्रसाद

दलित युवतीची हत्या झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अवधेश प्रसाद म्हणाले, "आत्तापर्यंत मी निर्भया हत्याकांडाबाबतचे ह्रदयद्रावक घटना ऐकत होतो. काल मी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलो होतो. लोकांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे", असं म्हणत समाजवादी पक्षाचे खासदार पत्रकार परिषदेत रडू लागले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आता आम्ही देशापुढे जाऊन काय बोलणार? देश आम्हाला याबाबत विचारणा करेल. 

रडत असताना अवधेश प्रसाद म्हणाले, एका दलित मुलीला विवस्त्र करुन काय काय करण्यात आले. तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण निर्भयापेत्रा भयंकर आणि गंभीर आहे. मी त्या मुलीच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. तिच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तिचा अंत्यविधी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार होऊ शकला नाही. तिचा दफनविधी करण्यात आलाय. 

पोलिसांनी कुटुंबियांच्या माहितीकडे लक्ष दिले असते तर मुलीचे प्राण वाचले असते - अखिलेश यादव 

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव याबाबत बोलताना म्हणाले,  'अयोध्येतील ग्रामसभा सहानवन (सरदार पटेल वॉर्ड) येथे 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दलित कुटुंबातील मुलीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. तिचे दोन्ही डोळे फोडलेले आहेत. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. तिला अमानुष वागणूक दिली गेली. प्रशासनाने तीन दिवस आधीच कुटुंबियांच्या माहितीकडे लक्ष दिले असते तर मुलीचे प्राण वाचू शकले असते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Crime News: कधी घरात, कधी फोटो स्टुडिओत, अल्पवयीन बहिणीवर भावाचा अत्याचार, पीडिता गर्भवती अन्... पुण्यातील घृणास्पद प्रकार

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
Embed widget