एक्स्प्लोर

Atiq Ashraf Murder case: लॉरेन्स बिश्नोईसारखं नाव कमावण्यासाठी केली हत्या', अतिक-अशरफ हत्या प्रकरणातील आरोपींचे चार गौप्यस्फोट

Atiq Ashraf Murder case: अतिक-अशरफ हत्या प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी चार मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

Atiq Ashraf Murder case: गँगस्टरपासून माफिया आणि नंतर राजकीय नेता बनलेले अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्यांचे बंधू अशरफ अहमद (Ashraf Ahmed) याची 15 एप्रिलच्या रात्री भयावह पद्धतीने हत्या करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात दोघांना मेडिकल चेकअपसाठी घेऊन जात असताना तिघांनी रात्री साडेदहा वाजता गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. आता या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलीस चौकशीदरम्यान रोज नवनवे खुलासे करत आहेत. नुकतेच चौकशीदरम्यान त्यांनी चार मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

पहिला गौप्यस्फोट: अटकेत असलेला एक हल्लेखोर म्हणजेच सनी हा अतिक अहमद यांची हत्या करुन लॉरेन्स बिश्नोईसारखं नाव कमवू पाहत होता. कुख्यात गुंड बिश्नोईसारखं नाव कमवण्यासाठी हल्लेखोराने बेभान होऊन मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या केली.

दुसरा गौप्यस्फोट: हल्लेखोर सनीवर याआधीही दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्यावर 2016 मध्ये हमीरपूरच्या कुरारा पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 2019 मध्ये हमीरपूरच्याच सुमेरपूर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरा गौप्यस्फोट: तुरुंगात असताना हल्लेखोर सनी आणि लवनेश तिवारी यांची भेट झाली होती आणि पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळाली होती. या दोन हल्लेखोरांची भेट कधी झाली? त्यानंतरच त्यांनी मिळून अशा प्रकारचा प्लॅन बनवला होता का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

चौथा गौप्यस्फोट: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक अहमद यांची पत्नी शाइस्ता ही प्रयागराजमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी अतिकची पत्नी रोज रात्री आपलं ठिकाण बदलते. अतिकचे लोकल नेटवर्क शाइस्ताला लपण्यात आणि वारंवार ठिकाण बदलण्यात मदत करत आहेत.

अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांच्या हत्येनंतर पोलिसांनी प्रयागराजमधील कायदा व सुव्यवस्था कडक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सध्या संपूर्ण राज्यात कलम 144 लागू केले आहे.

उत्तर प्रदेश सरकारने रविवारी  केली तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती

हत्याप्रकरणी चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने रविवारी तीन सदस्यीय न्यायिक आयोगाची नियुक्ती केली. या चौकशी आयोगाने आपला अहवाल सरकारला दोन महिन्यांत द्यायचा आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभरात सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. प्रयागराजमध्ये ज्या भागात अतिक अहमद याचे निवासस्थान आहे, त्या भागात गस्त वाढविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Atiq Ahmed Murder Case: अतीक अहमदच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, 2017 पासून झालेल्या सर्व एन्काऊंटर्सच्या चौकशीची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget