Athar Aamir Khan : टीना दाबीचा घटस्फोटीत पती, आयएएस अतहर खानची सोशल मीडियावर हवा
Athar Aamir Khan : टीना दाबीचा पूर्व पती आयएएस अतहर आमिर खान सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे.
IAS Athar Aamir Khan : 2016 बॅचच्या UPSC राजस्थान कॅडरच्या टॉपर IAS टीना दाबी (Tina Dabi) पुन्हा लग्नबंधनात अडकणार असल्याने चर्चेत आहे. नुकतेच टीना दाबीने सोशल मीडियावर प्रदीप गावंडेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. टीना दाबी 2013च्या बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे (IAS Dr. Pradeep Gawande) यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. टीना दाबीच्या लग्नामुळे सध्या तिचे पूर्व पती आयएएस अतहर आमिर खान (Aamir Khan) चर्चेत आहे. अतहर आमिर खान सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतो.
आयएएस अतहर आमिर खानचा मोठा चाहतावर्ग
आयएएस अतहर खूपच देखणे आहेत. सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. ते सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी IAS अतहर आमिर खानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक स्टायलिश फोटो शेअर केला होता. या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
आयएएस अतहर आमिर खान 2015 सालच्या UPSC परिक्षेतील दुसरे टॉपर होते. सध्या अतहर श्रीनगरमध्ये आहे. आयएएस अतहर श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त असण्यासोबतच त्यांच्याकडे श्रीनगर स्मार्ट सिटी लिमिटेडचे सीईओ पद देखील आहे.
View this post on Instagram
अतहर आमिर खान त्यांच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अतहरने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोला एक लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
अतहर 2018 साली टीना दाबीसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण 2018 साली त्यांचा घटस्फोट झाला. आता 20 एप्रिल 2022 रोजी IAS प्रदीप गावंडे यांच्यासोबत टीना लग्नबंधनात अडकणार आहे.
कोण आहेत टीना दाबी?
सर्वात प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांच्या यादीत टीना दाबी यांचा समावेश आहे. सोशल मीडिया असो की मीडिया, त्या नेहमीच माध्यमांत चर्चेत असतात. टीना यांचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस टॉपर टीना दाबी यांची त्याच वर्षी दुसरे टॉपर बनलेल्या अतहर यांच्याशी ओळख झाली. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2018मध्ये लग्न केले होते. त्यावेळी या लग्नाची खूप चर्चा झाली होती. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि काही कारणास्तव दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
संबंधित बातम्या
Ukraine Russia War : युक्रेनचा पलटवार, रशियाच्या हद्दीत घुसून केला पहिला हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 एप्रिल 2022 | शनिवार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha