एक्स्प्लोर

कोटामध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा हिरवा कंदील

राजस्थान मधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या पत्रावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिसाद दिला आहे.

मुंबई : राजस्थान राज्यातील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना घरी आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या पत्रावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी प्रतिसाद दिला आहे. कोटामध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करणारे जवळपास दीड हजार ते दोन हजार मराठी विद्यार्थी अडकले आहेत. गहलोत यांच्या प्रतिसादामुळे कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सत्यजीत तांबे याना पत्र पाठवून महाराष्ट्र सरकारसोबत या विषयावर चर्चा होत असून लवकरच निर्णय निघेल अशी आश्वासन दिले आहे. सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत पुढील प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली.

विद्यापीठांच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतलेला नाही : उदय सामंत 

लवकरच दोन हजाराच्या आसपास मराठी विद्यार्थी स्वगृही परतणार राजस्थान कोटा येथे मूळचे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले जवळपास 1500-2000 विद्यार्थी लॉकडाऊन मुळे अडचणीत अडकले असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या प्रकरणी संवेदनशीलता दाखवत तातडीने पुढाकार घेत महाराष्ट्र आणि राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांकडे विद्यार्थ्यांना स्वगृही परतायची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी सत्यजीत तांबे यांना ट्विट करून दोन्ही राज्य सरकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी हालचाली करत आहेत, अशी माहिती दिली. सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे राजस्थान सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद देण्याची मागणी केली आहे, सोबतच पुण्यात अडकलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या स्वगृही पोहचवण्यासाठी हालचाली सुरू करण्याबाबत सूचना केली.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय : शिक्षण मंत्री उदय सामंत

महाराष्ट्र सरकारकडून प्रतिसाद नाही राजस्थान राज्यातील कोटा येथील अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी काहींनी राज्याचे मुख्य सचिव कार्यालयात संपर्क केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप येथील काही विद्यार्थ्यांनी केला आहे. तुम्ही स्वखुशीने तिथं गेला आहात, तिथेच राहा, असा सल्ला त्यांना देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. राजकीय व्यक्ती म्हणतात तुमचा विषय चालू आहे, काहीतरी करू, पाहू अशीचं उत्तरे मिळत असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा आणि हिमाचल प्रदेश या राज्य सरकारांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना नेलं असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. छत्तीसगडसारखं छोटं राज्यही 75 बस पाठवतंय. छत्तीसगड राज्यातील 2300 विद्यार्थी कोटात अडकले आहेत. मागल एक महिन्यापासून हे विद्यार्थी तिथेचं अडकले आहेत. छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. तरीही महाराष्ट्र सरकार फारसे सकारात्मक प्रयत्न करताना दिसत नसल्याचे दिसत आहे.

Kota Rajasthan | राजस्थानच्या कोटा शहरात अडकले महाराष्ट्रातील विद्यार्थी, खानवळ बंद असल्याने उपासमारीची वेळ

महत्त्वाच्या बातम्या

Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Embed widget