एक्स्प्लोर
'कपटी' संबोधल्याने केजरीवालांवर जेटलींकडून मानहानीचा खटला
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा नव्याने मानहानीचा खटला दाखल केला आहे. केजरीवालांचे वकील, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांनी गेल्या आठवड्यात उलटतपासणी दरम्यान जेटलींना 'कपटी' संबोधल्याचा आरोप आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यासह 'आप'च्या पाच नेत्यांवर जेटलींनी यापूर्वीच नागरी आणि गुन्हेगारी स्वरुपाचे मानहानीचे गुन्हे दाखल केले होते. जेटलींनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) मध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केजरीवालांनी केल्यामुळे हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यात नव्या खटल्याने भर पडली आहे.
या खटल्यात केजरीवालांची बाजू मांडणाऱ्या वकीलाची फी 'आम आदमी पक्षा'च्या फंडातून भरली जावी, अशी केजरीवालांची धारणा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राम जेठमलांनीची फी दिल्ली सरकारच्या तिजोरीतून दिली जात असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर केजरीवाल वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची बाजू मांडण्यासाठी जेठमलानींनी 3.8 कोटी रुपयांची बिलं आकारल्याचं म्हटलं जातं. याचे पैसे मुख्यमंत्री केजरीवालांनी जनतेच्या खिशातून दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र हा सरकारी लढा आहे, वैयक्तिक नाही, असा युक्तिवाद दिल्ली सरकारने केला.
नवा खटला दाखल करण्यापूर्वी अरुण जेटलींनी जेठमलानींना एक सवाल केला होता. केजरीवालांच्या आदेशानुसार तुम्ही मला उद्देशून 'कपटी' हा शब्द वापरलात का, असा प्रश्न करताच जेठमलानींनी होकारार्थी उत्तर दिला. त्यामुळेच जेटलींनी केजरीवालांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement