एक्स्प्लोर

आणीबाणी : जेटलींकडून इंदिरा गांधींची हिटलरशी तुलना

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले सध्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्या स्थितीची आठवण काढत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा क्रूर हुकूमशाह हिटलरसोबत केली आहे.

मुंबई : देशात 43 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या काळात माध्यमांचा आवाज दाबला गेला, विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणीबाणीत तुरुंगवास भोगलेले सध्याचे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्या स्थितीची आठवण काढत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना जर्मनीचा क्रूर हुकूमशाह हिटलरसोबत केली आहे. अरुण जेटली यांनी सोमवारी फेसबुक पोस्ट लिहून इंदिरा गांधींची हिटलरसोबत तुलना केली. सर्वसामान्यांसाठी असलेल्या संविधानाचं रुपांतर हुकूमशाहीमध्ये करण्यात आलं. संसदेतील विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि आपल्या अल्पमतातील सरकारला दोन तृतीयांश बहुमत असल्याचा दावा करण्यात आला, असं जेटलींनी म्हटलं आहे. ''इंदिरा गांधींनी अनेक खासदारांना तुरुंगात टाकलं आणि त्यांच्या अनुपस्थितीत बहुमत सिद्ध करुन घटनेत बदल केले. घटनेतील 42 व्या संशोधनांतर्गत हायकोर्टाच्या रिट पिटिशनचा अधिकार काढून घेण्यात आला, जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आत्मा होता. याशिवाय इंदिरा गांधींनी कलम 368 मध्येही बदल केला, जेणेकरुन घटनेतील बदल कायद्याच्या चौकटीत येणार नाहीत,'' असंही जेटलींनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. ''इंदिरा गांधींनी अशा गोष्टी केल्या, ज्या हिटलरनेही केल्या नव्हत्या. संसदीय कामकाजात माध्यमांच्या प्रसारणावर आणि प्रसिद्धीवर बंदी घालण्यात आली. इंदिरा गांधींनी संविधान आणि लोकप्रतिनिधी कायद्यात बदल केला. बदलांतर्गत पंतप्रधानांच्या निवडीला कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकत नव्हतं. लोकप्रतिनिधी कायदा पूर्वप्रभावी पद्धतीने बदलण्यात आला, जेणेकरुन इंदिरा गांधींच्या बेकायदेशीर निवडीला कायदेशीर ठरवलं जाईल. हिटलरच्या किती तरी पटीने पुढे जात इंदिरा गांधींनी भारताला घराणेशाही लोकशाहीत बदललं, असा आरोप जेटलींनी केला. स्वर्ण सिंह समितीने संविधानातील 42 व्या बदलांतर्गत अनेक बदल केले. यामध्ये सर्वात आक्षेपार्ह बदल होता तो म्हणजे संसदेचा कालावधी दोन वर्षांसाठी वाढवणे. घटनेतील तरतुदीनुसार लोकसभेचा कालावधी पाच वर्षांचा असतो, ज्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. मात्र आणीबाणीत तो बदल करण्यात आला. 1971 ते 1977 या काळात लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा होता, ज्यामध्ये नंतर जनता सरकारने बदल केला. जेटलींनी आणीबाणीसंबंधित 'इमर्जेंन्सी रिव्हिजिटेड' या ब्लॉग मालिकेतील पहिला ब्लॉग रविवारी फेसबुकवर लिहिला होता. याचा दुसरा भाग सोमवारी जेटलींनी लिहिला, ज्यामध्ये काँग्रेस आणि इंदिरा गांधी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. देशात 25 जून 1975 च्या मध्यरात्रीपासून आणीबाणी घोषित करण्यात आली होती, जी 21 मार्च 1977 पर्यंत चालू होती.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget