एक्स्प्लोर

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

याचिकाकर्त्यांना थोडी वाट पाहावी आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी सरकारला संधी द्यावी. जर स्थिती कायम राहिली तर तुम्ही कोर्टात पुन्हा याचिका दाखल करु शकता, असंही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुचवलं.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर परिसरात लागू करण्यात आलेल्या बंदीविरोधात काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र सध्या सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता कोर्टाने यामध्ये दखल दिली तर स्थिती आणखी गुंतागुतांची बनेल, असं कोर्टाने सांगितलं.

पूनावाला यांचे वकील मेनका गुरुस्वामी यांनी युक्तिवात करताना म्हटलं की, संचारबंदी असल्याने काश्मीरमधील नागरिकांना तेथील सैनिकांमुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यावर बोलताना कोर्टाने म्हटलं की, तुम्ही सैनिकांबाबत का बोलत आहात? सैनिकांचा आधार घेऊ नका. कोर्टाने याचिकार्त्यांच्या युक्तिवादावर अॅटर्नी जनरल यांचं उत्तर मागवलं आहे.

अॅटर्नी जनरन यांनी म्हटलं की, कायदा-सुव्यवस्था आमची प्राथमिकता आहे. लोकांचं जीवन सुरळीत व्हावं, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच याआधी काश्मीरमध्ये यापेक्षा अधिक गंभीर स्थिती होती. मात्र सध्याची स्थिती पुढील तीन महिन्यांच्या आत सामन्य होईल, अशी आशा आहे. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे गरजेचं आहे. जर एखादी गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल? असंही अॅटर्नी जनरन यांनी म्हटलं.

सरकार दररोज काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेत आहे. सरकारला काही दिवसांची मुदत दिली पाहिजे. काश्मीरमधील परिस्थिती एका रात्रीत सामान्य होणार नाही. कोर्टाने आज यामध्ये दखल दिली तर परिस्थिती गुंतागुंतीची होईल, असं कोर्टाने म्हटलं. याचिकाकर्त्यांनी तयारीविना घाई करत याचिका दाखल केली, असंही कोर्टाने म्हटलं.

याचिकाकर्त्यांना थोडी वाट पाहावी आणि परिस्थिती सामान्य होण्यासाठी सरकारला संधी द्यावी. जर परिस्थिती सुधारली नाही तर तुम्ही कोर्टात पुन्हा याचिका दाखल करु शकता, असंही कोर्टाने याचिकाकर्त्यांना सुचवलं.

जम्मू काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत काँग्रेस समर्थक तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. काश्मीरमधील कलम 144 हटवण्याचं आणि इंटरनेट सेवा सुरू करण्याची मागणी पूनावाला यांनी केली. तसेच काश्मीरमधील अटक केलेल्या नेत्यांच्या सुटकेची मागणीही त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Vinod Tawde: विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?

व्हिडीओ

Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget