एक्स्प्लोर
उरीत सहकारी जवानाकडूनच मेजरची गोळ्या झाडून हत्या
राष्ट्रीय रायफल्सच्या आठव्या बटालिअनच्या मेजरची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मोबाईल वापरल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरुन सहकारी जवानानेच मेजर शेखर थापा यांची हत्या केली.
काश्मीर : राष्ट्रीय रायफल्सच्या आठव्या बटालिअनच्या मेजरची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मोबाईल वापरल्याचा जाब विचारल्याचा राग मनात धरुन सहकारी जवानानेच मेजर शेखर थापा यांची हत्या केली.
उरीमधे मेजर शेखर थापा यांच्यावर सहकारी जवानाने गोळ्या झाडल्या. कर्तव्यावर असताना मोबाईल वापरला म्हणून आरोपी जवानाला मेजर थापा यांनी जाब विचारला होता. शिवाय कारवाईचाही इशारा दिला होता.
यानंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला आणि त्या दरम्यान मोबाईलचं थोडं नुकसान झालं. त्याचा राग डोक्यात ठेवून जवानाने मेजर शेखर थापा यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि उपचारादरम्यान मेजर थापा यांचा मृत्यू झाला.
दरम्यान आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे. मात्र मोबाईल वापरल्याचा जाब विचारल्याने मेजरचीच हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement