Terrorist Attack : स्वातंत्र्यदिनाआधी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, सैन्य दलाकडून पाच दहशतवाद्यांचा खात्मा
Terrorist Encounter Killed : जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलाकडून गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.
Jammu Kashmir Terrorist Killed : देशात यंदा 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day) उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून (Terrorist Attack) मोठा कट आखला जात होता. मात्र सैन्य दलाकडून (Indian Army) दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. लष्कराकडून गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान (Terrorist Killed) घालण्यात यश आलं आहे. स्वातंत्र्यदिनापूर्वीचा दहशतवाद्यांचा मोठा कट लष्करानं उधळून लावला आहे. सैन्य दलाने बुधवारी बडगाममध्ये (Budgam) तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. तर गुरुवारी राजौरीमध्ये (Rajouri) दोन दहशतवाद्यांचा खात्मा (Terrorist Killed) केला. यावेळी सैन्य दलाचे तीन जवानही शहीद झाले आहेत.
24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा
सैन्य दलाने मागील 24 तासांत जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir Encounter) बडगाम (Budgam) आणि राजौरी (Rajouri) या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बडगाम येथे तीन आणि राजौरी येथे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे.
बडगाममध्ये झालेल्या चकमकीत टीआरएफ दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लतीफ राथर (Latif Rather) हा दहशतवादीही मारला गेला. लतीफ राथर दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. टार्गेट किलिंगमध्ये (Target Killing) त्याचा हात होता. याशिवाय सैन्य दलाच्या जवानांच्या हत्येमागेही तोच सूत्रधार होता.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याचा मोठा कट
ब्रिगेडियर व्हीजेएस बिर्डी (Brigadier VJS Birdi) यांनी सांगितलं की, लतीफ हा साकिब अहमद खानसोबत दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. यांनी समीर अहमद, राहुल भट आणि अमरीन भट, खोनमोहचे सरपंच आणि चदूरा येथील वीटभट्टीवर स्थानिक नसलेल्यांची हत्या केली. ते स्वातंत्र्य दिनापूर्वी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. 10 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जवान आणि पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि तिघांना ठार केलं. या कारवाईत सुरक्षा दलाची कोणतीही जीवितहानी झाली नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Corbevax : 'कॉर्बेवॅक्स' बूस्टर आजपासून लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार
- दिल्लीत मास्कसक्ती, मुंबईसह राज्यातही कोरोनाबाधितांमध्ये वाढ, मास्कसक्ती होणार?
- Supreme Court on Freebies distribution : राजकीय पक्ष सत्तेत येण्यासाठी अवैधचे वैध करतात, फ्री स्कीम्सवरून सरन्यायाधीशांचे कडक ताशेरे! निवडणूक आयोगालाही फटकारले