(Source: Poll of Polls)
Corbevax : 'कॉर्बेवॅक्स' बूस्टर आजपासून लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार
ज्या नागरिकांनी Covaxin किंवा Covishield लशीचे दोन डोस घेतले आहेत. आता ते नागरिक Corbevax या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात.
Corbevax Vaccine : कोरोनाचे आकडे (Corona Cases) वाढत असताना आता पुन्हा बूस्टर डोसबाबत अधिक काळजी घेतली जाऊ लागली आहे. आता ज्या नागरिकांनी Covaxin किंवा Covishield लशीचे दोन डोस घेतले आहेत. आता ते नागरिक Corbevax या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. हैदराबादच्या बायोलॉजिकल ईद्वारे विकसित कॉर्बेव्हॅक्स लसीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. ही लस आजपासून लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.
Corbevax लस आज 12 ऑगस्टपासून सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही लसीकरण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांना COWIN अॅपवर बूस्टर डोससाठी नोंदणी मात्र करावी लागणार आहे. Corbevax निर्मात्या कंपनीचा दावा आहे की, या लसीच्या भारतीय विषयांवर व्यापक बूस्टर चाचण्या झाल्या आहेत आणि त्यानंतर भारतीय नियामक प्राधिकरणाकडून मान्यता मिळाली आहे. Corbevax ही विषम कोविड-19 बूस्टर म्हणून मान्यता मिळालेली भारतातील पहिली लस आहे. आरोग्य मंत्रालयाने या लसीला दिलेली मान्यता ही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कोण घेऊ शकतं Corbevax लसीचा बूस्टर डोस
18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, ज्यांनी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत. ते आता Corbevax लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. केंद्र सरकारनं ई कॉर्बेवॅक्स बूस्टर डोसला मान्यता दिली आहे. ज्यांना Covishield किंवा Covaxin चे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशा लोकांना तिसरा डोस (Booster Dose) म्हणून NTAGI बायोलॉजिकल ईद्वारे विकसित कॉर्बेव्हॅक्स लस देण्याची शिफारस केली होती. Corbevax ही भारतातील पहिली स्वदेशी विकसित रिसेप्टर बायडिंग डोमेन (RBD) प्रोटीन सब-युनिट लस आहे. जी कोरोनावर अत्यंत प्रभावी असल्याचंही सांगितलं जात आहे.
सध्या लहान मुलांना दिली जातेय Corbevax
भारतातील पहिली स्वदेशी विकसित RBD प्रोटीन सब्यूनिट लस Corbevax, सध्या COVID-19 लसीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जात आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 4 जून रोजी 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून Corbevax ला मंजूरी दिली.
सध्या, पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वापरण्यात आलेली कोविड-19 लस 18 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांना खबरदारी म्हणून दिली जात आहे. 18-59 वयोगटातील 4 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत, तर 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांना, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांना 5 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. 10 जानेवारीपासून भारतात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना लसींचा बूस्टर डोस (Booster Dose) देणं सुरू केलं आहे.