एक्स्प्लोर

मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर, कायद्यात महत्वाची तरतूद

कोलकाता येथील बलात्कार (Rape) आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata bannerjee) यांनी आज पश्चिम बंगाल विधानसभेत (Vidhansabha) बलात्कार विरोधी विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळल्याचं दिसून आलं. तर, महाराष्ट्रातील बदलापूर येथील बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही शाळेसंदर्भात कडक नियमावली जारी केली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत सर्वच सरकार गंभीर बनल्याचं दिसून येतं. त्यातच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही  गेल्याच आठवड्यात आपल्या भाषणात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं होतं. आता, पश्चिम बंगालमधील ममता सरकारने महिला अत्याचारसंदर्भाने विधानसभा सभागृहात अँटी रेप बिल मंजूर करण्यात आलं आहे. या नव्या कायद्यानुसार 36 दिवसांत बलात्काराच्या गुन्ह्यातील तपास पूर्ण होणार आहे. तर, पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास किंवा ती कोमात गेल्यास 10 दिवसांता दोषींना फाशी देण्याची तरतूद पश्चिम बंगालमधील या अँटी रेप विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसून येतं. 

कोलकाता येथील बलात्कार (Rape) आणि हत्येच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata bannerjee) यांनी आज पश्चिम बंगाल विधानसभेत (Vidhansabha) बलात्कार विरोधी विधेयकावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी, कोलकाता प्रशिक्षणार्थी बलात्कार आणि हत्या प्रकरणात आम्ही सीबीआयकडून न्यायाची अपेक्षा करतो. दोषींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, असे ममता यांनी म्हटले. तत्पूर्वी, आज अपराजिता विधेयक म्हणजेच अँटी रेप विधेयक (Anti rape Bill) विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे, आता राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीनंतर राज्यात अँटी रेप कायदा लागू होईल. या अँटी रेप बिलास अपराजिता महिला व बाल विधेयक 2024 असं नाव देण्यात आल आहे. राज्य सरकारने हे विधेयक मंजूर करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवले होते. कायदामंत्री मलय घटक यांनी विधानसभेत हे विधेयक सादर केले.

कोलकाता येथील आरजी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालायात 8 ऑगस्ट रोजी येथील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर, देशभरातली डॉक्टर्स संघटना आणि जनतेनं या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आंदोलने केली. अनेक राजकीय पक्षांनीही महिला अत्याचाराच्या घटनांवर आवाज उठवत राज्यात कडक कायदा लागू करण्याची मागणी केली होती. बलात्काऱ्यांना तात्काळ फाशी देण्याची मागणी पीडित कुटुंब व महिला वर्गाकडून केली जात होती. पश्चिम बंगालमध्ये या घटनेचे तीव्र पडसात उमटले, तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा, अशी मागणीही केली जात होती. या सर्व घटनांची दखल घेत पश्चिम बंगाल सरकारने बलात्कार विरोधी विधेयक सादर केले. 

अपराजिता अँटी रेप विधेयकातील तरतुदी

नव्या कायद्यानुसार बलात्कार पीडित महिलेचा मृत्यू झाल्यास, किंवा ती कोमात गेल्यास आरोपीला 10 दिवसांत फाशीची शिक्षा देण्यात येईल

बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोलशिवाय जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणार आहे.

बलात्कार प्रकरणातील गुन्ह्याचा तपास केवळ 21 दिवसांत पूर्ण करावा लागणार आहे, आवश्यकतेनुसार त्यास 15 दिवसांची वाढ देण्यात येईल.

प्रत्येक जिल्ह्यात अपराजिते टास्क फोर्स बनविण्यात येईल, ज्याचे नेतृत्व डीएसपी वर्गाचे अधिकारी करतील.  

हेही वाचा

पाण्यात अडकलेल्यांची तहान-भूक भागली; ड्रोनद्वारे प्रथमच अन्न पुरवठा, सैन्य दलही मदतीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget