एक्स्प्लोर
सासरी येत नसल्याने नवऱ्याने बायकोचे नाक कापले
पत्नी सासरी घरी येत नसल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीचे नाक कापल्याची धक्कादायक घटना कर्नाटक मधील अथणी तालुक्यातील कागवाड येथे घडली आहे.
बंगळुरु : पत्नी सासरी घरी येत नसल्यामुळे पतीने रागाच्या भरात पत्नीचे नाक कापल्याची धक्कादायक घटना कर्नाटक मधील अथणी तालुक्यातील कागवाड येथे घडली आहे. या घटनेनंतर आरोपी पती स्वतः कागवाड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
सुनीता सुरेश नाईक(30 )असे जखमी महिलेचे नाव आहे. पत्नी सासरी येत नसल्याच्या कारणावरून चिडलेल्या सुरेश नाईक याने हे कृत्य केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. एक ते दीड महिन्यांपासून सासरच्या त्रासाला कंटाळून सुनीता माहेरी राहत होती. त्यामुळे रागाच्या भरात सुरेशने सुनीताचे नाक कापले.
रविवारी रात्री सुरेश नाईक मद्यधुंद अवस्थेत पत्नीला भेटायला तिच्या माहेरच्या घरी आला. पत्नीला भेटल्यावर त्याने सोबत आणलेल्या चाकूने तिचे नाक कापले. त्यावेळी सुनीताने आरडाओरडा केल्यामुळे कापलेले नाक घेऊन सुरेश तिथून पळून गेला.
ही घटना सुनीताच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान सुरेश हा पोलिसात स्वतः हजार झाला. जखमी सुनीताचे कापलेले नाक शस्त्रक्रिया करुन पुन्हा बसवले जाईल, डॉक्टरांनी असा विश्वास सुनीताच्या नातेवाईकांना दाखवला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement