एक्स्प्लोर

महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या 'बाहुबली'ला लॅविश मराझो भेट

केरळमध्ये अनेकांना वाचवणाऱ्या मच्छिमार जैसलला आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र मराझो ही लॅविश कार भेट दिली आहे.

मुंबई: संवेदनशील मनाचा, समाजभान असणारा आणि औदार्य दाखवणारा दिलदार व्यावसायिक म्हणून आनंद महिंद्रा परिचीत आहेत. त्याचा परिचय पुन्हा एकदा आला आहे. पाऊस आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळमध्ये अनेकांना वाचवणाऱ्या मच्छिमार जैसलला, आनंद महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र मराझो ही लॅविश कार भेट दिली आहे. यापूर्वी देशाने आनंद महिंद्रा यांचं दातृत्व पाहिलं आहे. शौर्य, धाडस, समाजभान आणि कर्तृत्व दाखवणाऱ्यांचा गौरव आनंद महिंद्र नेहमीच करत आले आहेत. त्यांनी केरळमधील एका मेहनती रिक्षाचालकाला महिंद्रा सुप्रो मिनी ट्रक दिला होता. इतकंच नाही तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूलाही त्यांनी महिंद्राची TUV300 ही भारदस्त गाडी दिली होती. त्यानंतर आता आनंद महिंद्रांनी मच्छिमार असलेल्या जैसलला बक्षीस म्हणून नवी कोरी महिंद्र मराझो भेट दिली आहे. केरळमधील कालिकत इथे केरळच्या कामगार मंत्र्यांच्या हस्ते ही कार जैसलला सोपवण्यात आली. महिंद्रांचा दिलदारपणा, केरळच्या 'बाहुबली'ला लॅविश मराझो भेट केरळचा बाहुबली मच्छिमार असलेल्या जैसलने पुरात अडकलेल्यांना आपल्या बोटीतून सुरक्षित स्थळी पोहोचवलं होतं. महिला, मुलांना बोटीत जाता यावं यासाठी जैसलने बाहुबली सिनेमातील प्रसंगाप्रमाणे, स्वत:च्या पाठीची वाट करुन दिली होती. सोशल मीडियावर त्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. गेल्या महिन्यात केरळमध्ये पुराने थैमान घातलं होतं. यामध्ये अनेकांचे जीव गेले. पण जैसलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले. 32 वर्षीय मच्छिमार जैसलने एका वृद्ध महिलेला बोटीत चढण्यासाठी आपल्या पाठीचा आधार दिला होता. त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. जैसलने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत होतं. या घटनेनंतर केरळचे कामगार मंत्री टी पी रामकृष्णन यांनी जैसलला सन्मानित करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर महिंद्रांनीही पुढाकार घेतला. आनंद महिंद्रा केवळ घोषणा करुन थांबले नाहीत तर त्यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र मराझो देऊन त्याचा गौरव केला. महिंद्र मराझो महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची नवी 'मराझो' ही गाडी या महिन्याच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये लाँच करण्यात आली. एसयूव्ही सेगमेंटमधील ही नवी कार चार मॉडेलमध्ये उपलब्ध झाली आहे. स्टाईलिश मराझोच्या बोल्ड लूकने कारजगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. शार्क माशाप्रमाणे या गाडीचं डिझाईन करण्यात आलं आहे. या कारला 1.5 लिटर 4 सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे, जे 121 bhp पॉवर आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क तयार करतो. इंजिनला 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. इतकंच नाही तर महिंद्रा आता या कारच्या पेट्रोल व्हर्जनवरही काम करत आहे. संबंधित बातम्या  नाशिकमध्ये महिंद्राची मराझो गाडी लाँच, किंमत आणि सुविधा काय?   नाशिकमध्ये लाँच झालेली महिंद्राची 'मराझो' कशी आहे? 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Karnal Cylinder Blast: फुगे भरण्याच्या सिलेंडरचा भीषण स्फोट, गाडीचा चक्काचूर, थरार CCTV मध्ये कैद!
RSS Politics: 'संघावर बंदीची मागणी करणारे मूर्ख आणि राष्ट्रद्रोही', चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
Chandrashekhar Bawankule : कार्यकर्त्यांचे फोन सर्वेलन्सवर, बावनकुळेंच्या विधानाने खळबळ
FARMER DISTRESS: बळीराजासाठी उजळले ७००० दिवे, अनोखा दीपोत्सव
Dahisar River Fest: 'दहिसर रिव्हर फेस्टिव्हल'ला मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं ट्विट, शीतल म्हात्रेंच्या कामाचं कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
डोनाल्ड ट्रम्प यांचा 'डबल अटॅक', रशियन तेल कंपन्यावर निर्बंध; भारतावर काय परिणाम होणार? 
Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?
Chandrashekhar Bawankule : सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत; भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे खळबळजनक वक्तव्य
BMC : ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबई जिंकण्याचा निर्धार, पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची तारीख ठरली, मनसेसोबत युतीबाबतही घोषणा होण्याची शक्यता
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
काँग्रेस प्रदेध्याक्षांचे 26 वर्षांपासूनचे व्रत, आदिवासींसोबत दिवाळी, जेवण बनवलं, चिमकुल्यांना वाढूही घातलं
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Embed widget