आता सातासमुद्रापार जाणार 'अमूल ब्रँड, 'या' बड्या देशांमध्ये उपलब्ध होणार दूध, जाणून घ्या सविस्तर माहिती
गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ लिमिटेड (अमूल) ने मोठी घोषणा केली आहे. युरोपीय देशांमध्ये दूध आणि इतर उत्पादने आणण्याची योजना अमूलने आखली आहे

Amul Milk : गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ लिमिटेड (अमूल) ने मोठी घोषणा केली आहे. युरोपीय देशांमध्ये दूध आणि इतर उत्पादने आणण्याची योजना अमूलने आखली आहे. अमूल जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडसह इतर युरोपीय देशांमध्ये दूध आणि इतर उत्पादने आणणार आहे. अमूलने स्पेन आणि युरोपियन युनियनमध्ये अमूल दूध सादर करण्यासाठी को-ऑपरेटिव्हा गणदेरा डेल व्हॅले डे लॉस पेड्रोचेस (COVAP) या स्पॅनिश पहिल्या श्रेणीतील सहकारी संस्थेशी भागीदारी केली आहे.
अमूलने एका निवेदनात म्हटले आहे की, या भागीदारीद्वारे, अमूलचे दूध सुरुवातीला माद्रिद, बार्सिलोना आणि नंतर पोर्तुगालमधील मालागा, व्हॅलेन्सिया, एलिकॅन्टे, सेव्हिल, कॉर्डोबा आणि लिस्बन येथे सादर केले जाईल. अमूलचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले की, आम्हाला एक अतिशय प्रतिष्ठित स्पॅनिश दुग्ध सहकारी संस्था COVAP शी जोडले जाण्याचा खूप सन्मान आणि आनंद आहे. आम्हाला विश्वास आहे की संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात, 2025 मध्ये, आमची टीम अमूल ब्रँडला जगभरातील प्रत्येक भारतीयाच्या जवळ आणेल आणि सहकारी संस्थांमधील सहकार्याची शक्ती प्रदर्शित करेल.
अमूलचे दूध युरोपीय देशांमध्येही उपलब्ध होणार
भविष्यात, अमूल जर्मनी, इटली आणि स्वित्झर्लंडसह इतर युरोपीय देशांमध्ये दूध आणि इतर उत्पादने सादर करण्याची योजना आखत आहे. COVAP चे अध्यक्ष रिकार्डो डेलगाडो विझकैनो म्हणाले, अमूलसोबतची ही भागीदारी आम्हाला स्पेनमध्ये आमचा ब्रँड वाढवण्यासाठी आणखी एका सहकारी संस्थेसोबत काम करण्याची परवानगी देते, ज्यामुळं केवळ आमच्या स्वतःच्या दुग्ध उत्पादक सदस्यांनाच नव्हे तर भारतातील दुग्ध उत्पादक सदस्यांनाही फायदा होईल.
कशी झाली अमूलची सुरुवात?
14 डिसेंबर 1946 रोजी गुजरातमध्ये सहकारी संस्था म्हणून अमूलची सुरुवात झाली आहे. आज त्याचे काम लाखो लिटर दुधाच्या व्यवसायापर्यंत पोहोचले आहे. 250 लिटर दुधाच्या क्षमतेने सुरू झालेले अमूलचे काम आज 30 लाख लिटरपेक्षा जास्त आहे. कंपनीने या कामात लाखो लोकांना रोजगारही दिला आहे. भारताचे मिल्कमन म्हणून ओळखले जाणारे डॉ. वर्गीस कुरियन यांनी गुजरातमध्ये दोन गावांना सदस्य बनवून दुग्ध सहकारी संघाची स्थापना केली. म्हशीच्या दुधापासून पावडर तयार करणारे कुरियन हे जगातील पहिले व्यक्ती होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी गाईच्या दुधापासून पावडर बनवण्याचा ट्रेंड होता. पण कुरियन यांनी ही संपूर्ण प्रक्रिया बदलली आणि म्हशीच्या दुधापासून पावडर बनवण्यास सुरुवात केली.























