एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमृतसर रेल्वे अपघात : रुळावरुन दहन पाहणाऱ्या 'रावणा'चाही मृत्यू
रावण दहनाच्या दिवशीच रावण बनलेल्या दलबीर मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.
अमृतसर : पंजाबमधील अमृतसरमध्ये दसऱ्याला एक भीषण अपघात झाला. तिथल्या रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या एका व्यक्तीचाही या अपघातात मृत्यू झाला. रावण दहनावेळी रावणाची भूमिका साकारणारा दलबीर सिंह हा देखील रुळावर उपस्थित होता.
ज्यावेळी रावणाचा पुतळा जळत होता, त्यावेळी रामलीलामध्ये रावण बनलेला दलबीर सिंह रुळावरच उभा होता. रावण दहनाच्या वेळी भरधाव वेगाने ट्रेन आली आणि तिने दलबीरसह अनेकांना उडवलं. यात 61 जणांचा मृत्यू झाला तर 70 लोक जखमी आहेत.
दलबीरच्या मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. दलबीर आता या जगात नाही यावर पत्नी, आई आणि भावाला विश्वास बसत नाही. दलबीर अनेक वर्षांपासून रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारत आहे. राम आणि लक्ष्मणला तयार करायचं आहे असं सांगून तो काल घराबाहेर पडला होता.
रावण दहनाच्या दिवशीच रावण बनलेल्या दलबीर मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.
या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दलबीरच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी लोकांना सूचना दिली आहे आणि त्यामुळेच हा अपघात झाला.
कसा झाला अपघात?
जोडा फाटक परिसरात रावण दहन आणि फटाके फुटल्यानंतर गर्दीपैकी काही लोक रेल्वे रुळावर आले. रुळावर आधीपासूनच मोठ्या संख्येने लोक रावण दहन पाहत होते. संध्याकाळी सातच्या सुमार जोडा फाटकवरुन डीएमयू ट्रेन आली. ही डीएमयू ट्रेन जालंधरहून अमृतसरला जात होती. ही भरधाव ट्रेन रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवत निघून गेली. रावण दहनाच्या वेळी फटाक्याच्या आवाजामुळे ट्रेन आल्याचं समजलं नाही आणि हा दुर्दैवी अपघात झाला.
संबंधित बातम्या
अमृतसर अपघात, नवजोत कौर यांनी घटनास्थळाहून पळ काढला : प्रत्यक्षदर्शी
अमृतसर रेल्वे दुर्घटना : पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
अमृतसर ट्रेन अपघात, आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू : पंजाब पोलीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement