Corona Situation in India : महाराष्ट्रासह सहा राज्याची स्थिती चिंताजनक, आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
Corona Situation in India : मागील 24 तासांत देशभरात 3,17,000 नवे रुग्ण आढळले आहेत. एक जानेवारी रोजी देशात 22 हजार रुग्णांची नोंद झाली होती.
Corona Situation in India : देशातील कोरोना परिस्थितीवर आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) म्हणाले की, जागतिक स्थरावर कोरोनाची चौथी लाट सुरु आहे. गेल्या आठवड्यात जगभरात प्रत्येक दिवसाला 29,18,111 कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या चार आठवड्यात दक्षिण आफ्रिकामध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. आशियामध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. जगभरातील एकूण रुग्णापैकी आशियात 18% टक्के रुग्ण वाढत आहे.
राजेश भूषण म्हणाले की, भारतात सध्या 19 लाख अॅक्टिव रुग्ण (Active Cases in India) आहेत. गेल्या आठडड्यात देशात प्रतिदिवस सरासरी 2,71,000 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 16% इतका आहे. मागील 24 तासांत देशभरात 3,17,000 नवे रुग्ण आढळले आहेत. एक जानेवारी रोजी देशात 22 हजार रुग्णांची नोंद झाली होती. मागील चार दिवसांत देशातील रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे.
दुसऱ्या लाटेच्या तुलनेत, तिसऱ्या लाटेच्या वेळी, कोरोना मृत्यूसंख्या उपचाराधीन रुग्णसंख्येच्या प्रमाणात पुष्कळच कमी आहे. तसेच लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्याही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत अधिक आहे. कोरोना लाटेचा विचार करता, चिंताजनक स्थिती असणारी राज्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, दिल्ली, उत्तरप्रदेश ही आहेत. आम्ही सातत्याने या राज्यांच्या संपर्कात आहोत. या राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली असून, या राज्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले आहे, असे भूषण म्हणाले.
11 राज्यात 50 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव रुग्ण आहेत.
13 राज्यात 50 हजारपेक्षा कमी रुग्ण आहेत.
12 राज्यात 10 हजारपेक्षा कमी रुग्ण आहेत.
#COVID लाटेचा विचार करता, चिंताजनक स्थिती असणारी राज्ये- महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, दिल्ली, उत्तरप्रदेश.
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) January 20, 2022
आम्ही सातत्याने या राज्यांच्या संपर्कात आहोत. या राज्यांमध्ये केंद्रीय पथके पाठवली असून, या राज्यांना आवश्यक ते मार्गदर्शनही केले आहे- @MoHFW_India pic.twitter.com/84RyK9DZlG
सर्वाधिक अॅक्टिव रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आहेत. 12 जानवरीरोजी 335 जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5% होता. आता ही संख्या 515 इतकी झाली आहे. 30 एप्रिल 2021 रोजी 386452 नव्या रुग्णाची नोंद झाली होती. तर 3059 लोकांचा मृत्यू झाला होता. तर 20 जानेवारी रोजी 317532 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 380 जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत मृताची संख्या कमी आहे.