एक्स्प्लोर
बीग बी आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानात सहभागी
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत. या जाहिरातींचे व्हिडीओ केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज लॉन्च केले.
अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अँबेसिडर असतील. त्यांच्यापूर्वी अभिनेत्री विद्या बालन स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अँबेसिडर होती. स्वच्छ भारत अभियानाचे व्हिडीओ हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमधून दिसतील. टीव्हीसोबतच ऑनलाईन मीडियाच्या माध्यमातून हे व्हिडीओ लोकांसमोर येणार आहेत.
"स्वच्छ भारत अभियानासाठी दोघेही मान्यवर समर्पित भावनेने काम करण्यास इच्छुक आहेत. तसंच या दोघांनीही स्वच्छ भारत अभियानासाठी गरज असेल तेव्हा वेळ देण्याची तयारी दर्शविली आहे," असं केंद्रीय स्वच्छता मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं.
2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरु झालेल्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे 85 हजार गावांमध्ये शौचालय बांधून पूर्ण झाली आहेत. 2019 पर्यंत भारतातील सर्व गावं निर्मल करणार असल्याचंही तोमर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement