एक्स्प्लोर

'त्या' वृत्तासाठी भाजपाध्यक्षांचे पुत्र 100 कोटींचा दावा ठोकणार

मी व्यवसाय करताना कायद्याचं पूर्णपणे पालन करतो. मी सहकारी बँकेतून घेतलेलं कर्ज पूर्णपणे कायदेशीर आहे' असा दावा जय शाह यांनी केला आहे.

नवी दिल्ली : भाजपाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16 हजार पटींनी वाढल्याचं वृत्त दिल्यानंतर 'द वायर' वेबसाईट अडचणीत येण्याची शक्यता आहे. उलाढालीसंदर्भात खोटं वृत्त दिल्याचा आरोप करत जय शाह यांनी द वायर विरोधात शंभर कोटींचा मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी दर्शवली आहे. 'माझ्या संदर्भात एका वेबसाईटने खोटी बातमी दिली आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा खटाटोप आहे. माझे वडील अमित शाह यांच्या राजकीय वर्चस्वामुळे मला व्यवसायात यश मिळालं, असं भासवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र मी व्यवसाय करताना कायद्याचं पूर्णपणे पालन करतो. मी सहकारी बँकेतून घेतलेलं कर्ज पूर्णपणे कायदेशीर आहे' असा दावा जय शाह यांनी केला आहे. जय शाह यांच्यावर आरोप झाल्यानंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एका पत्रकार परिषदेत सर्व आरोप धुडकावून लावले होते. 'द वायर' या वेबसाईटने जय अमित शाह यांची कंपनी 'टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड' विषयी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. 'द वायर'चं वृत्त काय? जय शाह यांच्या कंपनीच्या बॅलन्सशीटनुसार 2013-14 मध्ये कंपनीकडे कुठलीही अचल संपत्ती किंवा स्टॉक्स नव्हते. इतकंच नाही, तर मार्च 2013 मध्ये कंपनीला एकूण 6 हजार 230 तर मार्च 2014 मध्ये 1 हजार 724 रुपयांचा तोटाच झाला होता. मात्र वडील भाजपच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर वेगाने वाढला.

जय अमित शाहांच्या कंपनीच्या टर्नओव्हरमध्ये 16 हजार पटींनी वाढ?

2014-15 या आर्थिक वर्षात कंपनीला 50 हजार रुपयांच्या उत्पन्नावर एकूण 18 हजार 728 रुपयांचा नफा झाला. तर 2015-16 या वर्षात कंपनीची उलाढाल थेट 80.5 कोटी रुपयांवर पोहचली. म्हणजेच 2014-15 च्या तुलनेत 16 हजार पटींनी कंपनीचा टर्नओव्हर वाढला. ऑक्टोबर 2016 मध्ये जय शाह यांच्या कंपनीने अचानक सगळे व्यवहार बंद केले. कंपनीला गेल्या काही वर्षांत 1.4 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, त्यामुळे कंपनीच्या संपत्तीत घट झाली आहे, असा अहवाल कंपनीच्या संचालकांनी दिला. टेम्पल एन्टरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली होती. जय शाह प्रमाणेच जितेंद्र शाहसुद्धा कंपनीचे संचालक आहेत. अमित यांच्या पत्नी सोनल शाह कंपनीच्या भागीदार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Embed widget