एक्स्प्लोर
Advertisement
पक्षपातीपणाच्या आरोपानंतर फेसबुककडून स्पष्टीकरण; आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही
भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नियंत्रित करत असून त्याद्वारे द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका अहवालाद्वारे केलाय. यावर फेसबुकने आज स्पष्टीकरण दिलंय.
नवी दिल्ली : भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नियंत्रित करत असून त्याद्वारे द्वेष पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका अहवालाद्वारे केला आहे. यावर आज (शुक्रवारी) फेसबुकने (Facebook) स्पष्टीकर दिलं आहे. फेसबुक हे नेहमीच खुलं, पारदर्शक आणि निःपक्षपाती प्लॅटफॉर्म आहे, जिथे लोक स्वत: ला मुक्तपणे व्यक्त करू शकतात, असं म्हणत आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून, आम्ही आमची धोरणे कशी लागू करतो त्यावरुन आमच्यावर पक्षपात केल्याचा आरोप होत आहे. आम्ही हे आरोप गांभीर्याने घेतले असून आम्ही कोणत्याही रूपात द्वेष आणि धर्मांधपणाचा निषेध करतो. यापूर्वीही आणि आताही वादग्रस्त पोस्ट हटवण्याचं आमचं काम सुरुच राहणार आहे. दरम्यान, अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जनरल या प्रमुख वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या अहवालामुळे भारतीय राजकीय वर्तुळ आणि सोशल मीडियाच्या जगात मोठी लढाई सुरु झाली आहे. या अहवालाचा दाखला देत, भाजप आणि आरएसएस फेसबुक आणि व्हॉट्सअॅप नियंत्रित करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हा वाद एवढा वाढला की फेसबुकला स्पष्टीकरण द्यावं लागलं.
फेसबुक इंडियाचे वाइस प्रेसिडेंट आणि मॅनेजिंग्ज डायरेक्टर अजीत मोहन यांनी ब्लॉग पोस्ट मध्ये म्हटलं आहे, की फेसबुक एक खुलं आणि पारदर्शी माध्यम आहे आणि तो कोणताबी पक्ष किंवा विचाराधारेचं समर्थन करत नाही. या प्लेटफॉर्मवर लोकांना त्यांचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. काही दिवसांपूर्वी आमच्यावर पक्षपाताचा आरोप केला जात आहे. मात्र, आम्ही कोणत्याही प्रकारचा द्वेश आणि कट्टरतेचा विरोध करतो.
देशाचं राजकारण तापवणारं भाजप-फेसबुक प्रकरण नेमकं काय आहे?
कम्युनिटी स्टँडर्ड्सचे काटेकोरपणे पालन
मोहन यांनी सांगितले, की कंटेंटसाठी आमचे निष्पक्ष नियम आहेत. हे कम्युनिटी स्टँडर्ड्सचे काटेकोरपणे पालन करते. ते म्हणाले, की संपूर्ण जगात आम्ही हिच पॉलिसी लागू करतो. यात कोणतीही परिस्थिती, धार्मिक किंवा सांस्कृतिक विश्वासाची पर्वा करत नाही. आम्ही नेत्यांद्वारे करण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्ट हटवल्या आहेत आणि पुढेही हटवण्यात येत राहिल.
काँग्रेस-भाजपमध्ये वाद
अमेरिकेतील वृत्तपत्राच्या वृत्तानंतर भारतात राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावर वाद रंगू लागला आहे. राहुल गांधी यांच्या आरोपांवर रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट करुन उत्तर दिलं आहे. "जे लूजर स्वत: आपल्या पक्षातील लोकांवर प्रभाव टाकू शकत नाही ते दावा करत आहेत की संपूर्ण जगाला भाजप आणि आरएसएस नियंत्रित करत आहेत. निवडणुकीआधी डेटाचा शस्त्र म्हणून वापर करताना रंगेहाथ पकडलं होतं, केंब्रिज अॅनालिटिका, फेसबुकशी तुमचे संबंध उजेडात आले आहेत, असे लोक आज निर्लज्जपणे प्रश्न उपस्थित करत आहेत."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement