चीनच्या वुहान प्रांतातून सुरु झालेल्या या कोरोना व्हायरसने आता जगभरातील अनेक देशांमध्ये पाय पसरते आहेत. या कोरोना व्हायरसची साखळी तोडणे दिवसेंदिवस कठीण बनलं आहे. अशात यावर कोणताही इलाज किंवा औषध उपलब्ध नसल्याने सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मात्र अमेरिकेने मलेरियाच्या औषधाला कोरोनावर उपचारासाठी मंजुरी देऊन भीती काहीशी कमी केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसवर उपचारासाठी मलेरियाच्या औषधाला मंजुरी देण्यात आली आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन असं या औषधाचं नाव आहे. या औषधाने कोरोना व्हायवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे, तसं परीक्षण करण्यात आलं असून परिणाम सकारात्मक आहे.
जगभरात दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जवळपास 9 हजारहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात ही गेल्या काही दिवसात कोरोनाचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. तर आतापर्यंत 186 जणांना देशात कोरोनाची लागण झाली आहे, तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील
पिंपरी चिंचवड - 11
पुणे - 8
मुंबई - 9
नागपूर - 4
यवतमाळ - 3
नवी मुंबई - 3
कल्याण - 3
अहमदनगर - 2
रायगड -1
ठाणे- 1
उल्हासनगर - 1
औरंगाबाद - 1
रत्नागिरी- 1
PM Narendra Modi | Janata Curfew | देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदी यांची घोषणा
संबंधित बातम्या
- Coronavirus | क्वॉरन्टाईनमधून पळ काढणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई करणार : अनिल देशमुख
- Coronavirus | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 49, दोघे व्हेंटिलेटरवर : राजेश टोपे
- Coronavirus | घाबरुन कोणतंही युद्ध जिंकता येत नाही, महाराष्ट्र नक्की जिंकणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 175, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद
- Coronavirus : क्वारंटाईनचा शिक्का असूनही चौघा संशयितांचा रेल्वेतून प्रवास