नवी दिल्ली : कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात ‘जनता कर्फ्यू’ करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी COVID-19 नावाच्या खास टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा केली आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामण याच्या नेतृत्वाखाली COVID-19 टास्क फोर्सची स्थापना केली आहे. करोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या व्हायरसचा प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी ही फोर्स काम करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर खूप परिणान पाहायला मिळाला आहे. ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करुन भारतीय अर्थव्यवस्था बळकट कशी करता येईल यासाठी हे फोर्स काम करेल.


रविवारी 5 वाजता कर्तव्य बजावणाऱ्या राष्ट्ररक्षकांचं कौतुक करा, नरेंद्र मोदींचं आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पाच वाजता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांचे घंटी, थाळी आणि टाळ्या वाजवून कौतुक करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा देणासाठई काही लोक काम करतं आहे. यात डॉक्टर, सफाई कर्मचारी, पोलीस, रेल्वे, बस, विमानतळ, अत्यावश्यक सर्व शासकीय कर्मचारी, माध्यमकर्मी यांचा समावेश आहे. हे सर्व लोक कोरोनाचा धोका पत्करत आपली सेवा उत्तमपद्धतीवने बजावत आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वा राष्ट्रभक्तांसाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचं आवाहन केलं आहे.


देशात 22 मार्च रोजी 'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदींची घोषणा 


कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनता कर्फ्यूची मागणी मी आज देशवासीयांकडे करतो आहे. जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध त्याचे पालन प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे अशी मागणी मी करतो आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनीही हा आदेश पाळावा असंही मोदींनी म्हटलं आहे.