एक्स्प्लोर
केंद्रात मोठे फेरबदल, दिग्गजांची खाती बदलली!
2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी मंत्रिमंडळात सर्वात मोठा फेरबदल केला आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर अगदी काही वेळातच खातेवाटपालाही सुरुवात झाली आहे. दिग्गजांची खाती बदलल्याचे खातेवाटपावरुन समोर आले आहे. विशेष म्हणजे इंदिरा गांधीनंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेची वर्णी लागली आहे. निर्मला सीतारमन यांच्या खांद्यावर संरक्षणमंत्रिपदाच्या धुरा सोपवण्यात आली आहे. 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मोदींनी मंत्रिमंडळात सर्वात मोठा फेरबदल केला आहे. मंत्रिमंडळातील 4 राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती दिली, तर 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. त्यानंतर मोदी थेट चीनला रवाना झाले. पण त्यापूर्वी खातेवाटपात सर्वात महत्वाचं असं संरक्षण मंत्रिपद त्यांनी निर्मला सीतारमन यांची वर्णी लावली. इंदिरा गांधींनंतर संरक्षण खातं सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरतील. कुणाला कोणतं मंत्रालय? कॅबिनेट मंत्री सुरेश प्रभू - वाणिज्य पियुष गोयल - रेल्वे उमा भारती - पेयजल आणि स्वच्छता धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम आणि कौशल्यविकास नितीन गडकरी - रस्ते वाहतूकसह गंगा स्वच्छता अभियानचा अतिरिक्त भार स्मृती इराणी - माहिती प्रसारण आणि वस्त्रोद्योग राज्यवर्धन राठोड - क्रीडामंत्री राज्यमंत्री सत्यपाल सिंग - शिक्षण राज्यमंत्री गजेंद्र शेखावत - कृषी राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी - नगरविकास राज्यमंत्री नरेंद्र तोमर - ग्रामविकास राज्यमंत्री अल्फोन्स कन्ननाथनम् - पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा - संस्कृती आणि पर्यावरण राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ल - अर्थ राज्यमंत्री आर. के. सिंग - ऊर्जा (स्वतंत्र कारभार)
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















