एक्स्प्लोर
Advertisement
डॉक्टर जोडप्याचा जमिनीपासून 125 फूट उंच आकाशात साखरपुडा!
अलाहाबाद : आपलं लग्न चर्चेत आणि कायम स्मरणात राहावं म्हणून काहीजण कोट्यवधींचा खर्च करतात, तर काही हटके स्टाईल अवलंबतात. मेडिकलचा अभ्यास करताना एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या एमबीबीएस डॉक्टर्सच्या जोडीनेही आपला साखरपुडा अनोख्या पद्धतीने केला. जमिनीपासून 125 फूट उंच आकाशात या एमबीबीएस डॉक्टर्सच्या जोडीने आपला साखरपुडा पार पाडला, जो साधरणत: कुणीही विसरु शकणार नाही.
अलाहाबादमध्ये झालेला अनोखा साखरपुडा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणाऱ्या या डॉक्टर जोडीने अलाहाबादमध्ये नदी संगमापासून 125 फूट उंच आकाशात हॉट एअर बलूनमध्ये स्वार होऊन हवेत तरंगत एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घातली. यावेळी वधू-वराचे काही नातेवाईकही उपस्थित होते.
डॉ. धीरज सिंह आणि डॉ. प्रीती सिंह असे या डॉक्टर जोडीचं नाव आहे. डॉ. धीरज हे मूळचे उत्तरखंडमधील हल्दवानी शहरातले असून, डॉ. प्रीती सिंह या उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवशी आहेत. कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत असताना धीरज आणि प्रीती यांची मुलाखत झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. डॉ. धीरज यांनी सर्जरीत पीजी, तर डॉ. प्रीती यांनी पॅथोलॉजीमध्ये पीजीचं शिक्षण घेतलं आहे.
डॉ. धीरज यांना अॅडव्हेंचर गोष्टींमध्ये रस असल्याने नेहमीच वेगळं काहीतरी करत असतात. गेल्या आठवड्यात त्यांना कळलं की, अलाहाबादमध्ये संगमावर माघ यात्रेतील हॉट एअर बलूनवर अनेकजण स्वार होत आहेत. याचवेळी नेमकं त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचं नियोजन सुरु होतं. मग डॉ. धीरज यांना हॉट एअर बलूनमध्ये स्वार होऊन आकाशात साखरपुडा पार पाडण्याची कल्पन सूचली.
फेब्रुवारीत 14 तारखेला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला डॉ. धीरज आणि डॉ. प्रीती विवाहबंधनात अडकणार आहेत. विवाहसोहळाही सगळ्यांच्या आठवणीत राहील असं काहीतरी करण्याची योजना दोघांनी आखली आहे. मात्र, लग्नासाठी काय अनोखी योजना आखली आहे, याबाबत खु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement