एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
22 ऑगस्टला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
देशभरातील बँक कर्मचारी येत्या 22 ऑगस्टला संप पुकारणार आहेत.
नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचारी येत्या 22 ऑगस्टला संप पुकारणार आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं (UFBU) संपाची हाक दिली आहे. युनियनच्या एका बड्या नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे.
देशभरातील नऊ मोठ्या बँक युनियन या संपात सहभागी होणार असल्याची माहिती यूएफबीयूनं दिली आहे. या संपात तब्बल 10 लाख बँक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, या संपाचा मोबाइल बँकिंग, नेट बँकिंग आणि एटीएम सेवांवर परिणाम होणार नाही.
ऑल इंडिया बँक एप्लॉईज असोसिएशन (एआयबीईए)चे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, 'आम्ही आधीच संपाची नोटीस दिली आहे. येत्या 22 ऑगस्टला संपूर्ण बँकिंग सेक्टर संपात सहभागी होणार आहे.'
बँक असोसिएशनच्या नेमक्या मागण्या काय?
- असोसिएशनची सर्वात महत्वाची मागणी म्हणजे, सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचं विलीनीकरण आणि खासगीकरण थांबवणं.
- बँकांचं खासगीकरण थांबवा अन्यथा देशाची अर्थव्यवस्था ढासळेल. असं असोसिएशनचं म्हणणं आहे.
- एफआरडीआय विधेयक मागे घ्या. या प्रमुख मागण्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement