एक्स्प्लोर
मक्का मस्जिद स्फोट: स्वामी असीमानंदसह सर्व निर्दोष
मक्का मस्जिद स्फोटाप्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं आहे.
हैदराबाद: राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या विशेष कोर्टाने 2007 मधील मक्का मस्जिद स्फोटाप्रकरणी स्वामी असीमानंदसह सर्व आरोपींना निर्दोष ठरवलं आहे.
या आरोपींविरोधात एनआयएला कोर्टासमोर ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं.
बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू
18 मे 2007 रोजी झालेल्या या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला होता. नमाजावेळी ऐतिहासिक मक्का मस्जिदेत हा स्फोट घडवण्यात आला होता. यामध्ये 9 ठार तर 58 जण जखमी झाले होते.
सुरुवातीच्या तपासानंतर हा खटला सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.
10 आरोपी
या स्फोटाप्रकरणी सीबीआयने एक आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर 2011 मध्ये या खटल्याचा तपास एएनआयकडे सोपवण्यात आला.
या स्फोटप्रकरणी स्वामी असीमानंदसह 10 जणांवर आरोप होता. यातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.
कोण कोण आरोपी?
- स्वामी असीमानंद
- देवेंद्र गुप्ता
- लोकेश शर्मा (अजय तिवारी)
- लक्ष्मण दास महाराज
- मोहनलाल रातेश्वर
- राजेंद्र चौधरी
- भारत मोहनलाल रातेश्वर
- रामचंद्र कलसांगरा (फरार)
- संदीप डांगे (फरार)
- सुनील जोशी (मृत)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement