एक्स्प्लोर
सपामध्ये उभी फूट, अखिलेश यादवांकडून 235 उमेदवारांची यादी जाहीर
लखनऊ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वीच समाजवादी पार्टीत फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लखनऊमध्ये सकाळी सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे हे सर्वच उमेदवार सायकल चिन्हाऐवजी दुस-या वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
उत्तरप्रदेश विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. यापैकी सपाच्या 393 उमेदवारांची यादी मुलायम सिंह यांनी दोन टप्प्यात जाहीर केली. त्यानंतर आज अखिलेश यादवांनी बैठक घेत 235 उमेदवारांची यादी जाहीर केली.
एकमेकांना विश्वासात न घेता या याद्या जाहीर केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव विरुद्ध मुलायम सिंग यादव असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement