Amarpreet Singh : एअर मार्शल अमरप्रीत सिंह होणार भारताचे नवे वायूसेनाप्रमुख, 59 व्या वर्षी तेजस विमान चालवून सर्वांना दिलेला आश्चर्याचा धक्का
Air Force : भारताच्या वायूसेनेचे प्रमुख म्हणून अमरप्रीत सिंह यांची निवड होणार आहे. वायूसेनाप्रमुख विवेक राम चौधरी 30 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत.
नवी दिल्ली: एअर मार्शल अमरप्रीत सिंह हे भारताचे नवे एअर चीफ मार्शल होणार आहेत. विद्यमान वायूसेनाप्रमुख विवेक राम चौधरी 30 सप्टेंबर 2024 ला सेवानिवृत्त होणार आहेत. चौधरी यांच्या जागी अमरप्रीत सिंह यांची नियुक्ती होणार आहे. सिंह सध्या वायूसेनेचे उप-प्रमुख म्हणून काम करत आहेत. 30 सप्टेंबरला दुपारपासून ते पदभार स्वीकारतील. तेव्हापासून ते भारताचे नवे एअर चीफ मार्शल असतील.
एयर मार्शल अमरप्रीत सिंह यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 ला झाला होता. अमरप्रीत सिंह यांनी भारताच्या वायूसेनेत 1 फेब्रुवारी 2023 ला भारताच्या वायूसेनेचे 47 वे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलं होतं. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या वायूसेनेचे एअर चीफ मार्शल म्हणून सिंह यांची नियुक्ती होईल, अशा चर्चा सुरु होत्या. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
अमरप्रीत सिंह यांची कारकीर्द
एअर मार्शल अमरप्रीत सिंह सिंह यांनी त्यांच्या कारकिर्दीत यश मिळवलेलं आहे. 21 डिसेंबर 1984 ला ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले होते. वायूसेना अकॅडमी,डुंडीगल येथून भारतीय वायूसेनेच्या लढाऊ तुकडीत त्यांनी पदार्पण केले होते. ते गेल्या 38 वर्षांपासून भारताच्या वायूसेनेत ते गेल्या 38 वर्षांहून अधिक काळ काम करत आहेत. अमरप्रीत सिंह यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि एअरफोर्स अकॅडमी, डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतलं आहे. डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टनचे विदयार्थी देखील ते राहिले आहेत. नवी दिल्लीच्या नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये देखील त्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे.
59 व्या वर्षी चालवलं तेजस विमान
भारताच्या वायूसेनेचे एअर चीफ मार्शल म्हणून अमरप्रीत सिंह 30 सप्टेंबरला पदभार स्वीकारणार आहेत. भारताचं लढाऊ विमान तेजस त्यांनी चालवलं होतं. अमरप्रीत सिंह यांनी वयाच्या 59 व्या वर्षी तेजस विमान चालवलं होतं. अमरप्रीत सिंह यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.
Air Marshal #AmarPreetSingh, is presently serving as Vice Chief of the Air Staff, as the next Chief of the Air Staff, in the rank of Air Chief Marshal, with effect from the afternoon of September 30, 2024.@IAF_MCC
— SansadTV (@sansad_tv) September 21, 2024
इतर बातम्या :
अदलाबदली होणारच! महाविकास आघाडीची 288 जागांवर पहिल्या टप्प्यातली चर्चा पूर्ण