(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Air India Emergency Landing : उड्डाण करताच विमानाचे इंजिन हवेतच थांबले, पुढे जे काही घडले, वाचा सविस्तर
Air India Emergency Landing : टाटा समूहाचे एअर इंडियाचे A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे तब्बल 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले.
Air India Emergency Landing : टाटा समूहाचे एअर इंडियाचे A320neo विमानाचे इंजिन अचानक हवेतच थांबले. आणि प्रवाशांच्या ह्रदयाचा ठोकाच चुकला..! काय घडले नेमके?
विमानाचे इंजिन अचानक हवेतच थांबले...
टाटा समूहाचे एअर इंडियाचे A320neo विमान काही तांत्रिक बिघाडामुळे 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर परतले. अधिकाऱ्यांनी शुक्रवारी माहिती दिली की, विमानाने उड्डाण घेत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे त्याचे एक इंजिन हवेतच थांबले. त्यानंतर पायलटने विमान परत विमानतळावर उतरवले.
या घटनेची चौकशी
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, बेंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या जहाजात पाठवण्यात आले आहे. हवाई वाहतूक नियामक महासंचालक या घटनेची चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्यांना विचारले असता ते म्हणाले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते, एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये CFM लीप इंजिन बसवलेले आहेत. मात्र अशी घटना घडण्यामागे काय कारण आहे. याची चौकशी केली जाईल
विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले.
A320neo विमानाने सकाळी 9.43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. पण उड्डाणानंतर काही मिनिटांत, वैमानिकांना विमानाच्या एका इंजिनाबाबत उच्च एक्झॉस्ट तापमानाबाबत चेतावणी मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिन बंद झाल्यानंतर पायलटने सकाळी 10.10 वाजता विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले.
हे ही वाचा>
Mother Selling Breast Milk : संकटसमयी धावली आई! कुटुंबाच्या मदतीसाठी तिने विकले आपले 118 लिटर दूध, हृदयस्पर्शी कथा
...म्हणून तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावं, काय आहेत फायदे
Health Tips : बडीशेप आणि साखर खाण्याचे अनके फायदे; हिमोग्लोबिन वाढेल, दृष्टीही सुधारेल
Weird Fact Of The Day : मानवी पोटात असे बॅक्टेरिया सापडले आहेत, जे वीज निर्माण करतात? संशोधनातून बाब समोर