एक्स्प्लोर

Air India Plane Crash Ahmedabad :  जळालेल्या मृतदेहांची कशी केली जाते DNA चाचणी? कसं केलं जातं नमुना संकलन?

Air India Plane Crash Ahmedabad : अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, ओळख पटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डीएनए चाचणी.

Air India Plane Crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने (Air India Plane Crash Ahmedabad) संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले होते. यामध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झााला आहे. यामध्ये विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. या भयानक अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत, ओळख पटवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डीएनए चाचणी. डीएनए चाचणी कशी केली जाते याबाबत तुम्हाला माहिती आहे का? अहमदाबाद विमान अपघातात जळालेल्या मृतदेहांचा कोणता भाग  डीएनए चाचणीसाठी मदत करेल? याबाबतची माहिती पाहुयात. 

डीएनए चाचणी म्हणजे काय?

डीएनए म्हणजेच डीऑक्सीरायबोन्यूक्लिक अॅसिड चाचणी. ही एक वैज्ञानिक तंत्र आहे जे एखाद्या व्यक्तीची अनुवांशिक रचना तपासून ओळखते. जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए वेगळा असतो. तो पेशींच्या केंद्रकात आढळतो. मृतदेह ओळखणे खूप कठीण असतानाही तंत्र विशेषतः उपयुक्त ठरते. अहमदाबाद विमान अपघातात, मृतदेह गंभीरपणे जळाले आहेत. ज्यामुळं डीएनए चाचणी ही ओळख पटवण्याचे मुख्य साधन आहे.

डीएनए चाचणी कशी केली जाते?

डीएनए चाचणी ही एक कठीण पण पद्धतशीर प्रक्रिया आहे. यामध्ये, अनेक टप्प्यांत तपास केला जातो.

नमुना संकलन: 

सर्वप्रथम, डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले जातात. अहमदाबाद विमान अपघातानंतर, गुजरात सरकारने बीजे मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए नमुने ठेवण्याची व्यवस्था केली आहे. मृतांच्या शरीरातून हाडे, दात किंवा ऊतींचे नमुने घेतले जातील. हे त्यांच्या नातेवाईकांच्या जसे की पालक, मुले किंवा भावंडांच्या रक्त किंवा लाळेच्या नमुन्यांशी जुळवले जातील.

मृतदेहांमधून नमुने कसे घेतले जातात? 

गंभीरपणे जळालेल्या शरीरातून डीएनए काढण्यासाठी फेमर, ह्यूमरस किंवा बरगड्यांसारख्या हाडांचे नमुने घेतले जातात. याशिवाय, दात किंवा उर्वरित ऊती देखील खूप प्रभावी आहेत. प्रत्यक्षात, हाडे आणि दात खूप महत्वाचे आहेत कारण उच्च तापमानातही त्यांच्यामध्ये डीएनए जतन केला जातो.

नातेवाईकांकडून नमुने घेतले जातात

नातेवाईकांकडून रक्त, लाळ किंवा गालाच्या पेशी (बकल स्वॅब) घेतले जातात. हे नमुने मृतांच्या डीएनएशी जुळण्यासाठी वापरले जातात.

नमुना प्रथम स्वच्छ केला जातो

अपघातात जळालेल्या मृतदेहांमधून डीएनए काढणे अत्यंत कठीण आहे, कारण उच्च तापमान आणि रसायने डीएनए नष्ट करू शकतात. अशा परिस्थितीत, नमुना प्रथम स्वच्छ केला जातो, जेणेकरून कचरा किंवा सूक्ष्मजीव यांसारखे बाह्य दूषित घटक काढून टाकता येतील. यासाठी, नमुना नळाच्या पाण्याने आणि १०० टक्के इथेनॉलने धुतला जातो. हाडे आणि दात पावडरमध्ये बारीक करण्यासाठी निर्जंतुकीकरण उपकरणे वापरली जातात.

हाडांमधून डीएनए कसा काढला जातो?

डीएनए काढण्यासाठी सेंद्रिय निष्कर्षण प्रक्रिया वापरली जाते. या अंतर्गत, नमुना रासायनिक द्रावणात टाकून डीएनए वेगळे केले जाते. अहमदाबाद अपघातात विमानाला लागलेल्या आगीमुळं मृतदेह मोठ्या प्रमामात प्रभावित झाले होते. अशा परिस्थितीत, डीएनएच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. जळलेल्या अवशेषांमधून डीएनए काढण्यात नवीन तंत्रे यशस्वी झाली आहेत.

तपासणीसाठी किती डीएनए आवश्यक?

रिअल-टाइम पीसीआर (पॉलिमरेज चेन रिअॅक्शन) द्वारे काढलेल्या डीएनएचे प्रमाण आणि गुणवत्ता तपासली जाते. अशा परिस्थितीत, सर्वप्रथम डीएनए चाचणीसाठी पुरेसा आहे की नाही याची खात्री केली जाते.

डीएनए प्रोफाइलिंग कसे केले जाते?

डीएनए प्रोफाइलिंगमध्ये, शॉर्ट टँडम रिपीट्स (STR) तपासले जातात. हे डीएनएचे असे भाग आहेत जे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असतात. त्यानंतर, डीएनए प्रोफाइल तयार केले जाते. अहमदाबाद अपघातात सुमारे 1000 डीएनए चाचण्या केल्या जात आहेत, ज्यामध्ये मृतांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे नमुने जुळवणे समाविष्ट आहे.

कोणत्या नातेवाईकांचे नमुने घेतले जातात?

मृतांचे डीएनए प्रोफाइल नातेवाईकांच्या नमुन्यांशी जुळवले जाते. यासाठी, पालक किंवा मुलांच्या डीएनएशी जुळवणे अधिक अचूक मानले जाते, कारण त्यांच्यात अधिक अनुवांशिक समानता आहे. जर अहमदाबाद विमान अपघातासारख्या अपघातात तपास केला जात असेल, तर डीएनए चाचणीच्या या प्रक्रियेला अनेक दिवस लागू शकतात.

महत्वाच्या बातम्या:

Ahmedabad Plane Crash Numerology: 265 मृत्यू, 1 चमत्कार! 11A क्रमांकाच्या सीटवर बसलेला 'तो' प्रवासी वाचला, अंकशास्त्रानुसार हा 'मास्टर नंबर' कसा ठरला?

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Embed widget