एक्स्प्लोर
केवळ 3500 रुपयांत विमान प्रवास, एअर इंडियाची विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर
नवी दिल्लीः एअर इंडियाने विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर आणली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देशांतर्गत विमान प्रवास केवळ 3500 रुपयांपासून सुरु होणार आहे, असं एअर इंडियाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी विमान प्रवास करता यावा यासाठी एअर इंडियाने ही खास ऑफर आणली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून प्रवास शुल्कात सर्व प्रकारच्या करांचा समावेश असणार आहे. मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
अशी आहे ऑफर
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी देशांतर्गत प्रवास करण्यासाठी विमानाचे प्रवास शुल्क 3500 रुपयांपासून सुरु होणार आहे. या ऑफरनुसार एक हजार किलोमीटर पर्यंतचा प्रवास करण्यासाठी 3500 रुपये एवढे शुल्क लागणार आहे. तर एक हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर असल्यास 5500 रुपये मोजावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या राज्यात परीक्षा, महाविद्यालय प्रवेश आणि इतर शैक्षणिक कामांसाठी या ऑफरचा फायदा होणार आहे, असं एअर इंडियाने सांगितलं.
बुकिंग पुढील आठवड्यापासून
एअर इंडियाच्या या ऑफरची बुकिंग मर्यादित कालावधीसाठी असणार आहे. या ऑफरची बुकिंग पुढच्या आठवड्यातील बुधवारपासून सुरु होणार असून 31 जुलैपर्यंत चालणार आहे. बुकिंग केल्यानंतर 1 जुलै ते 31 ऑगस्ट या कालावधीत प्रवास करावा लागेल. शासकीय मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी या ऑफरचा लाभ घेऊ शकतील.
एअर इंडियाप्रमाणेच मागील आठवड्यात गो एअर या विमान कंपनीने सुद्धा अशाच प्रकारची ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार विद्यार्थ्यांना विमान प्रवासासोबतच लगेजच्या खर्चातही सुट देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement