एक्स्प्लोर
…आणि महिला खासदाराने डीएमके खासदाराच्या श्रीमुखात भडकावली!
नवी दिल्ली : दिल्लीत विमानतळावर तामिळनाडूच्या दोन खासदारांमध्ये हमरीतुमरी झाली. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, तामिळनाडूमधील एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा आणि डीएमकेचे खासदार तिरुची शिवा या दोघांमध्ये दिल्ली विमानतळावर वाद झाला.
विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन्ही खासदारांची सीट एकाच एअरक्राफ्टमध्ये होती. जेव्हा डीएमकेचे खासदार तिरुची शिवा यांना याबाबत कळलं, तेव्हा त्यांनी शशिकला यांच्यासोबत प्रवास करण्यास नकार दिला आणि एडीएमकेच्या खासदार शशिकला पुष्पा यांना एअरक्राफ्टमधून उतरण्यास सांगितले.
तिरुची शिवा यांच्या या भूमिकेमुळे शशिकला भडकल्या आणि त्यांनी रागाच्या भरात विमानतळावर सर्वांसमोर तिरुची यांच्या श्रीमुखात भडकावली.
त्यानंतर तिरुची यांनी आपला प्रवास रद्द करुन, शशिकला यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निघून गेले. मात्र, शशिकला चेन्नईच्या दिशेने रवाना झाल्या.
या प्रकरणावर राज्यसभा अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही खासदारांमधील कुणीही याबाबत तक्रार दाखल केली, तर त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement