एक्स्प्लोर

Ayesha suicide | आयशाच्या आत्महत्येविषयी ओवैसी यांच्या विधानाचे सर्वत्र कौतुक

आयशा आत्महत्या प्रकरणाबद्दल ओवैसी म्हणाले की मी त्या मुलीचा व्हिडिओ पाहिला आहे. पत्नीला मारणे हा पुरुषार्थ नाही. बायकोकडे पैशांची मागणी करणे म्हणजे पुरुषत्व नाही आणि जो असे करतो त्याला माणूस म्हणणे योग्य नाही.

नवी दिल्लीः पतीच्या त्रासाला कंटाळून अहमदाबादच्या साबरमती नदीत उडी घेऊन आयुष्य संपवणाऱ्या आयशाच्या मृत्यूबद्दल अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण कोणत्याही धर्मातील असलात तरी हुंड्याचे लोभ दूर करा असे मी आपणा सर्वांना आवाहन करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की मी त्या सर्व मुस्लिमांना आवाहन करीत आहे, अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम (प्रेषित मोहम्मद) यांनी इर्शादला सांगितले होते की तुमच्यातील सर्वांत चांगला तो आहे जो आपल्या कुटुंबाशी चांगला वागतो.

ओवैसी म्हणाले, "अहमदाबादमध्ये एका मुस्लिम मुलीने आत्महत्या केल्याचा एक वेदनादायक व्हिडिओ आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करीत आहे, धर्म काहीही असो, हुंडाबळीचा लोभ संपवा. आपण पुरुष असाल तर आपल्या पत्नीवर अत्याचार करणे हा मर्दपणा नाही. बायकोला मारहाण करणे म्हणजे पुरुषत्व नाही. बायकोकडे पैसे मागणे हे पुरुषत्व नाही. जर तुम्ही असे कृत्य करत असाल तर तुम्ही माणूस म्हणवण्यास योग्य नाही.''

ते म्हणाले, "त्याने (आयशाचा नवरा) निर्दोष मुलीवर अत्याचार केला. या त्रासाला कंटाळून तिनं मोठं पाऊल उचललं. एका निरागस मुलीसोबत असे करताना अशा लोकांना लाज वाटायला हवी. मी अल्लाहला प्रार्थना करीन की अल्लाह तुमचं वाटोळं करो"

एआयएमआयएम प्रमुख म्हणाले, "प्रत्येक बापाचं दुःख तुम्ही समजू शकत नाही." मला असे बरेच बाप माहित आहेत जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माझा हात धरतात आणि म्हणतात की असदसाहेब मुलीच्या लग्नाची काही व्यवस्था करा. मरण्याअगोरद काहीतरी घडू द्या. ''

ते म्हणाले, "काय झालंय या लोकांना, अजून किती महिलांचा जीव आपण घेणार आहे?." तुम्ही कसले मर्द आहात? जे महिलांना मारता? तुमच्यातील माणुसकी मेली आहे का? असे किती लोक आहेत जे आपल्या पत्नीवर अत्याचार करतात? हुंड्यासाठी गर्भवती महिलांना मारहाण करत घराबाहेर काढता आणि स्वतःला मोठा देवदूत समजता. लक्षात ठेवा, आपण जगाला फसवू शकता आणि अल्लाहला नाही. पण, हे लक्षात असुद्या तुम्ही जगाला धोका देऊ शकता अल्लाह नाही. अल्ला सगळं पहातोय तो पीडित व्यक्तीला नक्कीच पाठींबा देईल.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम (प्रेषित मोहम्मद) च्या त्या सर्व मुस्लिमांना मी आवाहन करतो आहे की, आपल्यातील सर्वांत चांगला तो आहे जो आपल्या कुटुंबाशी चांगला वागतो. सर्वोत्कृष्ट अखलाक (चरित्र) तो आहे जो आपल्या पत्नीशी चांगला वागतो. '' आयशाच्या आत्महत्येविषयी ओवैसी यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. लोक हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर करत आहेत तसेच त्यांचे कौतुकही करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
साखरेच्या दरानं चिंता वाढवली! 10 वर्षानंतर प्रथमच भारत सरकार घेणार मोठा निर्णय, देशात सध्या किती साखर शिल्लक? 
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget