एक्स्प्लोर

Subsidy On Seeds : 'या' राज्यात शेतकऱ्यांना मोफत बियाणे, वाचा काय आहे योजना? 

Seed Subsidy Scheme : विविध राज्य सरकारकडून या बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. तर काही राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जाते.

Seed Subsidy Scheme : बियाणे (Seeds) जर चांगले असतील तर शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होते. त्यामुळे पेरणी करताना चांगले प्रमाणित बियाणांचा वापर करणं गरजेचं असतं. परंतु सध्या बाजारात सुधारित वाणांचे बियाणे खूप महाग आहे. ते बियाणे खरेदी करणं प्रत्येक शेतकऱ्याच्या (Farmers) आवाक्यात नाही. त्यामुळे विविध राज्य सरकारकडून या बियाणांवर अनुदान उपलब्ध करुन दिले जाते. अशातच राजस्थान सरकारकडून (Rajasthan Govt) मात्र, शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. 

शेतकरी आणि शेतकरी गटांना मोफत बियाणे 

राजस्थान सरकारने किसान साथी योजना आणि मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी आणि शेतकरी गटांना मोफत बियाणे वितरित केले जातात. जेणेकरुन त्यांना कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकेल. मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, कृषी विभागाने 30 ते 50 शेतकऱ्यांचे गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेणेकरुन ते परस्पर सहकार्याने शेती करु शकतील. आता कृषी विभाग या शेतकऱ्यांच्या गटांची ओळख करून देतो आणि RSSC मार्फत मोफत बियाणांचे वाटप केले जाते. यानंतर शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते, त्यानंतर शेतकरी बियाणे तयार करुन विक्री करु शकतात.

या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन दिले जाते. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना 25 टक्के अनुदानावर बियाणांचा पुरवठा केला जातो. अनेक वेळा राजस्थान सरकार केंद्राच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे मिनी किट पुरवते. या योजनांमध्ये राष्ट्रीय तेलबिया आणि तेल पाम मिशन आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांचाही समावेश आहे. राजस्थानातील विविध भागातील माती आणि हवामानाच्या आधारे पिकाच्या बियांची निवड केली जाते.

कोणाला घेता येणार बीज स्वावलंबन योजनेचा लाभ?

मुख्यमंत्री बीज स्वावलंबन योजनेंतर्गत, दारिद्र्यरेषेखालील SC, ST, अल्प आणि अत्यल्प, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेतकर्‍यांना प्राधान्याने बियाणांचे मिनी किट वितरित केले जाते. शेतकरी कुटुंबातील महिला सदस्याला राज्य सरकारकडून बियाणांचे स्वतंत्र मिनी किट देण्याची तरतूद आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना बियाणांचे मिनी किटही प्राधान्याने वाटप केले जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील कृषी विभाग कार्यालय किंवा कृषी विज्ञान केंद्राशीही संपर्क साधू शकता.

महत्त्वाच्या बातम्या:

Nagpur : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खतांच्या सुलभ पुरवठ्यासाठी 70 भरारी पथकाद्वारे नियंत्रण, कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2025 Ajit Pawar: राज्यातील मुस्लीम तरुणांसाठी महायुती सरकारचं मोठ्ठं पाऊल, अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली ही महत्त्वाची घोषणा घोषणा
अजित पवारांची मुस्लीम समाजासाठी महत्त्वाची घोषणा, 'या' संस्थेसाठी भरभक्कम निधीची तरतूद
Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Maharashtra Budget 2025-26 अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02.00 PM TOP Headlines 02.00 PM 10 March 2025Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 01.00 PM TOP Headlines 01.00 PM 10 March 2025Chhagan Bhujbal on Onion : कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांनी कांदाप्रश्न केंद्रांसमोर मांडावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2025 Ajit Pawar: राज्यातील मुस्लीम तरुणांसाठी महायुती सरकारचं मोठ्ठं पाऊल, अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली ही महत्त्वाची घोषणा घोषणा
अजित पवारांची मुस्लीम समाजासाठी महत्त्वाची घोषणा, 'या' संस्थेसाठी भरभक्कम निधीची तरतूद
Maharashtra Budget 2025: मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
मुंबईसाठी महायुती सरकारचा मोठ्ठा प्लॅन, रोजगार आणि गुंतवणूक खटाखट वाढणार, अर्थमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची घोषणा
Maharashtra Budget 2025-26 अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
अजित पवारांनी सादर केला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प; पायाभूत सुविधा, मुंबई, पुणे, शेतकरी, एका क्लिकवर A टू Z माहिती
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; फडणवीस सरकारच्या 10 मोठ्या घोषणा
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
सोने-चांदीचे भाव पुन्हा कडाडले, होळीपूर्वीचा सोन्याचा दर किती?
सोने-चांदीचे भाव पुन्हा कडाडले, होळीपूर्वीचा सोन्याचा दर किती?
Embed widget