एक्स्प्लोर
Advertisement
आग्रा शहराचं नाव 'अग्रवाल' करा, भाजप आमदाराची नामांतराची मागणी
आग्रा शहराला अग्रवाल किंवा अग्रवन हे नाव द्यावं, अशी मागणी भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी केली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशमधील अलाहाबाद आणि फैजाबाद या शहरांनंतर नामांतराचा सपाटाच लागण्याची चिन्हं आहेत. आता आग्रा शहराचं नाव बदलण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. आग्रा शहराला अग्रवाल किंवा अग्रवन हे नाव द्यावं, असं भाजप आमदार जगन प्रसाद गर्ग यांनी म्हटलं आहे.
'आग्रा' या नावामागे कोणतीही पार्श्वभूमी नाही किंवा त्याला ऐतिहासिक महत्त्व नाही. पूर्वी या ठिकाणी जंगलं होती आणि अग्रवाल समाज या भागात राहत होता. अग्रवालांचा मोठा वारसा असलेल्या शहराला त्यांचं नाव देण्यात यावं, असं गर्ग यांनी म्हटलं आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेला आग्य्रातील ताजमहाल पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. आग्य्राला नवी ओळख मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दुसरीकडे सरदानामधील भाजपचे खासदार संगीत सोम यांनी मुझफ्फरनगरचं नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची मागणी केली आहे. शहराचं नाव बदलण्याची स्थानिकांची मागणी असल्याचं सोम यांनी म्हटलं आहे. भाजप भारताचं गतवैभव पुन्हा मिळवून देत असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.
याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलाहाबाद शहराचं प्रयागराज तर फैजाबादचं नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement