एक्स्प्लोर

दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर पी. चिदंबरम यांना अटक, राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड

तब्बल दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आय़एनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : तब्बल दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर आय़एनएक्स मीडिया घोटाळ्य़ाप्रकरणी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी चिदंबरम यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला. परिणामी सीबीआयने दिल्ली पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. दिल्ली पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केल्यानंतर सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या रडारवर असलेले पी. चिदंबरम गेल्या 27 तासांपासून बेपत्ता होते. ते थेट आज रात्री माध्यमांसमोर आले. त्यांनी रात्री 8.15 वाजता नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचे खंडन केले. चिदंबरम माध्यमांसमोर येताच सीबीआयचं पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस मुख्यालयात पोहोचलं. परंतु चिदंबरम सीबीआयच्य़ा हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. सीबीआयसोबतच ईडीची टीम चिदंबरम यांच्या निवासस्थानी पोहोचली. परंतु सीबीआयला चिदंबरम यांच्या घरात जाण्याची परवानगी मिळाली नाही. परिणामी सीबीआयच्या पथकाला चिदंबरम यांच्या घराच्या प्रवेशद्वारावरुन (गेवटवरुन), भिंतीवरुन उड्या मारुन घरात प्रवेश करावा लागला आहे. त्यानंतर सीबीआयच्या टीमने चिदंबरम यांना ताब्यात घेतले. रात्री 10.15 वाजता चिदंबरम यांना अटक झाली. 27 तासांनंतर पी. चिदंबरम माध्यमांसमोर, म्हणाले माझ्यावरील आरोप खोटे चिदंबरम यांनी त्यांच्या घराचा दरवाजा न उघडल्याने सीबीआयनं अक्षरशः कसरत करुन निवासस्थानाच्या गेटवर चढून निवासस्थानी प्रवेश केला. दरम्यान यामुळे निवासस्थानाबाहेर परिस्थिती चिघळली होती. चिदंबरम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. काँग्रेस कार्यकर्ते सीबीआय आणि ईडीच्या कारवाईत अडथळा आणत होते. कार्यकर्त्यांनी राडा सुरु केल्यानंतर सीबीआयने दिल्ली पोलिसांकडे मदत मागितली. दिल्ली पोलिसांनी या राडा करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. चिदंबरम यांच्या घराबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा, गेटवरुन उड्या मारुन सीबीआय पथक घरात दरम्यान 27 तासानंतर पी. चिदंबरम काँग्रेस कार्यालयात अवतरले आणि आयएनएक्सप्रकरणी आपल्यावर कुठलाही आरोप नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्याशिवाय आपला आणि आपल्या कुटुंबियांवर कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचेही त्यांनी सांगितले. चिदंबरम यांनी अवघी 10 मिनिटं पत्रकार परिषद घेतली. परंतु पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणं त्यांनी टाळलं. चिदंबरम कार्यालयातून घराकडे निघाले आणि इतक्यात सीबीआयचं पथक काँग्रेस कार्यालयात पोहोचलं. मात्र चिदंबरम सीबीआयच्य़ा हाती लागले नाहीत. उलट ते घरी पळाले. आता त्यांच्या घराबाहेर मोठा राडा सुरु आहे. पाहा काय म्हणाले पी. चिदंबरम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget