एक्स्प्लोर

Samudrayaan Mission : चांद्रयानानंतर आता समुद्रयान! भारताकडून मोहिमेची तयारी जोरात, मंत्री किरेन रिजिजूंची माहिती

SamudraYaan Mission : या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. 

SamudraYaan Mission : चांद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर, भारत आता महासागरात आपल्या मोहिमेची तयारी करत आहे. समुद्रयान (SamudraYaan) प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.  पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली असून त्यांनी सोशल मीडिया X वर या संबंधित पोस्ट केली आहे.

'समुद्रयान मिशन' 
या मोहिमेला 'समुद्रयान मिशन' असे नाव देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या सबमर्सिबलमध्ये लोकांना समुद्रात खोलवर नेले जाईल त्याच्या तपासणीचे काम 2024 मध्ये पूर्ण होईल. जाणून घ्या सविस्तर

सबमर्सिबल : 'मत्स्य 6000' 
भविष्यात भारत 2047 साली म्हणजेच स्वातंत्र्याच्या 100 वर्षांच्या आत एक विकसित राष्ट्र बनण्‍याच्‍या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने समुद्राच्या तळाशी खोलवर जाण्याची मोहीम सुरू केली आहे. भारत सरकार एक सबमर्सिबल बनवत आहे, ज्याला 'मत्स्य 6000' असे नाव देण्यात आले आहे. समुद्रात 6000 मीटर खोलवर शोध घेण्याच्या उद्देशाने हे सबमर्सिबल तयार केले जात आहे. ही सबमर्सिबल 3 लोकांना समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत नेण्यास सक्षम असेल. रिजीजूंनी माहिती दिल्यानुसार, याआधी भारताने 7000 मीटर खोलीपर्यंत मानवरहित पाणबुडी पाठवण्याचे मिशन पूर्ण केले आहे. आता मानवयुक्त मोहीम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. 

'मत्स्य 6000' ही अत्याधुनिक पाणबुडी 
ही पाणबुडी टप्प्याटप्प्यानी तयार केली जात आहे. पहिल्यांदाच 500 मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी तयार करण्यात आली. यानंतर, भारताने मानवरहित रोबोटिक पाणबुडी समुद्राखाली 6000-7000 मीटर खोलीपर्यंत उतरवली. आता समुद्राची खोली मोजण्याचे काम मानवयुक्त सबमर्सिबलकडे सोपविण्याची तयारी सुरू आहे.

2024 पर्यंत पूर्ण होईल पाणबुडीचे काम
मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे. ज्यामध्ये 3 लोक बसू शकतील. सेन्सर बसवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी असेल जी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असेल. याचा संपूर्ण प्रवास 12 कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. 'मत्स्या 6000' या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. 2026 मध्ये ते समुद्राच्या खोलवर उतरवले जाईल. 

समुद्राच्या खोलात दडलेली खनिजे तुम्हाला पाहायला मिळणार 
या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. 6 किमी खोलीपर्यंत मानवयुक्त सबमर्सिबलसह समुद्राखाली जाणे म्हणजे कोबाल्ट, दुर्मिळ पृथ्वीचे घटक, मॅंगनीज इत्यादी समुद्रातून बाहेर पडणारी खनिजे मानव स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकणार आहे. त्यांचे वेगळे नमुने गोळा केल्यानंतर ते विश्लेषणासाठी देखील वापरले जाऊ शकतात. सबमर्सिबल 'मत्स्या 6000' ची सामान्य ऑपरेटिंग क्षमता 12 तासांची असेल, परंतु आपत्कालीन परिस्थितीत त्याची कार्य क्षमता 96 तासांपर्यंत वाढवता येईल. या मोहिमेचा इको-सिस्टमवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही कारण त्याचा एकमेव उद्देश आहे. असं रिजीजू यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जाNashik Baby Kidnapping | नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची चोरी Special ReportSuresh Dhas On Santosh Deshmukh Case| बीडचा बिहार नाही, हमास केला, धस यांचा हल्लाबोल Special ReportLadki Bahin Yojana| लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
आकाच्या 'आका'वर सर्वपक्षीयांचा 'आक्रोश', बीडच्या गुंडगिरीची चर्चा अन् धनंजय मुंडेंकडे 'मोर्चा'
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Embed widget