एक्स्प्लोर
गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती, महाराष्ट्रात कधी?
गांधीनगर: गुजरातमध्ये छोट्या खासगी वाहनांना टोलमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल सरकरानं केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
शेजारच्या गुजरातने छोट्या खासगी वाहनांना टोलमुक्ती दिली असताना, महाराष्ट्रात हा निर्णय कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र टोलमुक्त करु, अशी घोषणा केली होती. मात्र फडणवीस सरकार सत्तेत येऊन दोन वर्षे झाली, मात्र सरसकट टोलमुक्ती झालेली नाही.
नाही म्हणायला देवेंद्र फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील 12 टोलनाके कायमचे बंद आणि 53 टोलनाक्यांवरुन छोट्या वाहनांना सूट दिली. मात्र सरसकट टोलसूट मिळालेली नाही.
आता भाजपची सत्ता असलेल्या आपल्या शेजारील गुजरातमध्ये छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. त्यामुळे एरव्ही प्रत्येक गोष्टीत गुजरातच्या पावलावर पाऊल ठेवणारे देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रात टोलमुक्ती कधी घोषित करणार हा प्रश्न आहे. छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाली तर महाराष्ट्रातील जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो.
संबंधित बातम्या
आजपासून 12 टोलनाके बंद, 53 टोलमधून छोट्या वाहनांना सूट
राज्यातील बंद केलेल्या टोलनाक्यांची यादी
टोलमधून मुंबईकरांची मुक्तता कधी?
‘माझा’च्या माध्यमातून स्कूलबस मालक आणि राज्य सरकारची चर्चा, स्कूलबस टोलमुक्त !
हायकोर्टाच्या आदेशानुसारच खारघर टोलनाक्यावर वसुली : चंद्रकांत पाटील
खारघरचा टोल सुरू, 15 किलोमीटरसाठी 70 रुपये !
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement