Afghanistan : काबुलमध्ये अडकलेले 255 भारतीय स्वदेशी परतले, एअर इंडिया आणि वायुसेनेचं विमान दिल्लीत दाखल
अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामामध्ये ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहे.
नवी दिल्ली : अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर आता त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी परत आणण्याचे काम जोरात सुरु आहे. आज सकाळी भारतीय वायुदलाच्या आणि एअर इंडियाच्या विमानाच्या माध्यमातून जवळपास अडीचशे भारतीय दिल्लीत परतले.
भारतीय वायुदलाच्या C-17 विमानाने आज सकाळी 168 भारतीय वायुदलाच्या हिंडन बेसवर दाखल झाले. त्या आधी एअर इंडियाने 87 भारतीयांना नवी दिल्लीत सुखरुप आणले. काल 150 भारतीयांच्या अपहरणाचे वृत्त आल्यानंतर भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका करण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग आला. अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्याच्या कामामध्ये ताजिकिस्तानमधील भारतीय दूतावास महत्वाची भूमिका बजावत आहे.
"Evacuation continues! IAF special repatriation flight with 168 passengers onboard, including 107 Indian nationals, is on its way to Delhi from Kabul," tweets MEA Spokesperson Arindam Bagchi.
— ANI (@ANI) August 22, 2021
(Pic Source: MEA Spokesperson) pic.twitter.com/MyKbwR3gKb
भारतीय नागरिक सुखरुपपणे एयर इंडियाच्या विमानात बसताच 'भारत माता की जय' असा एकच जल्लोश सुरु झाला.
अफगाणिस्तानात काबुल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त शनिवारी हाती आलं होतं. नंतर या दीडशे भारतीयांना ताबिलान्यांनी सोडून दिलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व भारतीय हे सुरक्षित असून त्यांचा पासपोर्ट तपासल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं होतं.
आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केला होता. तसेच अपहरण केल्याचे वृत्त तालिबान्यांनी फेटाळले होते. तालिबानी प्रवक्ता अहमद्दुल्ला वसीक यांनी हे वृत्त निराधार असून तालिबान अशी कृती कधीच करणार नाही, असा दावा केला होता.
संबंधित बातम्या :
- Taliban News: मुला-मुलींनी एकत्र शिक्षण घ्यायचं नाही, तालिबान्यांचा फतवा; महिला शिक्षकांनाही केल्या सूचना
- Angelina Jolie Instagram : अँजेलिना जोलीने शेअर केलेल्या अफगाणी मुलीच्या पत्राला 24 तासात तब्बल 50 लाख शेअर; पत्र वाचून अनेकांना भावना अनावर
- Afghanistan : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खलिल हक्कानी काबुलच्या रस्त्यावर; अमेरिकेचे 37 कोटींचे बक्षीस