एक्स्प्लोर

कोरोनाचं संक्रमण हवेतून होण्याचा धोका, केंद्र सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

कोणतीही लक्षणे  नसलेल्या बाधित व्यक्तीकडून देखील कोरोना व्हायरसचा फैलाव होतो. हे ध्यानात ठेऊन लोकांनी मास्क वापरणे चालू ठेवावे, एकावर एक असे दोन मास्क किंवा एन 95 मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांचे एअरोसोल्स 10 मीटर दूरवर हवेत पसरू शकतात, तर ड्रॉपलेट्स 2 मीटरपर्यंत पसरू शकतात. कोरोनाबाधित व्यक्तीची लाळ आणि नाकातून शिंकेद्वारे बाहेर पडणारे थेंब श्वास घेताना अथवा  बोलताना, गाताना, हसताना, खोकताना बाहेर पडल्यामुळे  कोरोना व्हायरसचे वाढते. ही बाब लक्षात घेत केंद्र सरकारने नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोणतीही लक्षणे  नसलेल्या बाधित व्यक्तीकडून देखील कोरोना व्हायरसचा फैलाव होतो. हे ध्यानात ठेऊन लोकांनी मास्क वापरणे चालू ठेवावे, एकावर एक असे दोन मास्क किंवा एन 95 मास्कचा वापर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे महत्वाचे आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या गाईडलाईनमध्ये असं म्हटलं आहे की, ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांच्याकडून संसर्ग होऊ शकतो. सरकारने वेंटिलेशनची विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. चांगल्या वायुवीजन असलेल्या ठिकाणी संसर्ग पसरवण्याचा धोका कमी असतो. पंखे योग्य ठिकाणी लावावा आणि दारे, खिडक्या थोड्या उघड्या ठेवल्यास हवेची गुणवत्ता देखील सुधारते. खिडक्या आणि दारे बंद ठेवून, संक्रमित हवा खोलीत सतत गोळा होत राहते. यामुळे दुसर्‍या व्यक्तीलाही हा संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.

या व्यतिरिक्त सध्याच्या घडीला लोकांना डबल मास्क किंवा एन -95 मास्क घालायचा सल्ला देण्यात आला आहे. सर्जिकल मास्कसह आणखी एक मास्क घालता येऊ शकतो. सर्जिकल मास्कच्या जागी दोन सूती मास्क देखील घातले जाऊ शकतात. सर्जिकल मास्क फक्त एकदाच वापरला पाहिजे. याशिवाय दरवाजाची हँडल, स्विचबोर्ड, टेबल-खुर्च्या अशा अधिक संपर्कात येणार्‍या वस्तू स्वच्छ ठेवल्या पाहिजेत, असं सरकारने सूचवलं आहे. 

मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणा असलेल्या इमारतींमध्ये एअर फिल्टरेशन  कार्यक्षमता सुधारणे  उपयुक्त ठरते. कार्यालये, सभागृह, शॉपिंग मॉल्स इत्यादींमध्ये गॅबल फॅन सिस्टम आणि रूफ  व्हेंटिलेटर्स  वापरण्याची शिफारस केली जाते. फिल्टर्सची  वारंवार साफसफाई आणि ते बदलण्याची  शिफारस केली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget