Aditya L-1 : आदित्य एल 1 संदर्भात मोठी अपडेट, यानाचा मार्ग बदलला; अवघ्या 16 सेकंदात केला महत्त्वपूर्ण बदल
Aditya L1 Update ISRO : आदित्य 'आदित्य L1'च्या मार्गात थोडासा बदल करण्यात आला आहे जेणेकरून त्याच्या वाटेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही.
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन (ISRO) संस्था अर्थातच इस्रोचे 'आदित्य एल-1' (Aditya L1) यान हे सातत्याने त्याच्या प्रवासाचे टप्पे यशस्वीरित्या पूर्ण करत असल्याची माहिती समोर येत आहे. पृथ्वी (Earth) आणि सूर्य (Moon) यांच्यामध्ये 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या L1 बिंदूवर हे यान पोहचणार आहे. दरम्यान, इस्रोने रविवारी (8 ऑक्टोबर) रोजी यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. या यानावर सतत लक्ष ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांनी या यानाद्वारे मिळालेल्या माहितीचे मूल्यमापन केले आहे. त्यानंतर त्याच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. जेणेकरुन यशस्वीरित्या या यानाला कोणत्याही अडथळ्याशिवाय त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचता येईल.
#AdityaL1 successfully performed a 16 sec Trajectory Correction Maneuver (TCM) burn on friday to refine its trajectory to the L1 point. 🔥 #ISRO https://t.co/Jzt7hajCA9 pic.twitter.com/4rC5ipUvE4
— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) October 8, 2023
इस्रोने ट्वीट करत यांसदर्भात माहिती दिली आहे. इस्रोने त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आदित्य एल1 हे अंतराळयान सुरक्षित आहे. दरम्यान त्याचा प्रवास देखील यशस्वी सुरु आहे. 6 ऑक्टोबर रोजी त्यामध्ये थोडा बदल करण्यात आला. या यानाच्या मार्गात बदल करण्यात आला असून अवघ्या 16 सेकंदात ही सुधारणा करण्यात आलीये. या प्रक्रियेला ट्रॅजेक्टोरी करेक्शन मॅन्युव्हर (TCM) असे म्हणतात.
बदल आवश्यक होता
इस्रो ने 19 सप्टेंबर रोजी लॅग्रेजियन पॉईंट 1 चा मगोवा घेतला. त्यानंतर असे लक्षात आले की यानाच्या मार्गात बदल करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान या प्रक्रियेमुळे आता आदित्य एल 1 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे याची देखील खात्री केली जाईल. दरम्यान आदित्य L1 आता प्रवास करत असल्याने काही दिवसांत मॅग्नेटोमीटर देखील पुन्हा सुरु करण्यात येईल. दरम्यान आदित्य एल 1 आतापर्यंत पृथ्वी बाउंड मॅन्युव्हर आणि ट्रान्स लॅग्रेन्जियन पॉइंट 1 इन्सर्शन मॅन्युव्हर यशस्वीरित्या पूर्ण केलं असल्याची माहिती देखील दिली आहे.
सूर्याच्या अभ्यासाठी भारताचं पहिलं मिशन
आदित्य एल1 हे सूर्याचा अभ्यास करणारे भारताचे पहिले मिशन आहे.2 सप्टेंबर रोजी ISRO ने आदित्य एल1 लॉन्च केले होते. तर त्याच्या नियोजित स्थळी पोहचण्यासाठी त्याला चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी या यानामध्ये सात वेगवेगळे पेलोड बसवण्यात आले आहेत. दरम्यान हे संपूर्ण यान हे भारतातच विकसित करण्यात आले असून यामध्ये वापरण्यात आलेल्या वस्तू भारतीय बनावटीच्या आहेत.
हेही वाचा :