एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हिंमत असेल तर माझ्याशी भिडा, काटजूंनी मनसेला ललकारलं
मुंबई: बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलाकारांना काम देण्यासंदर्भात सुरु असलेल्या वादात आता सर्वाच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजूंनीही उडी घेतली आहे. काटजूंनी बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आव्हान देणारे ट्वीट केले आहेत.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते करण जोहर यांच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद आलम काम करत असल्याने, याच्या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यावरुन काटजूंनी मनसेला ललकारले आहे.
काटजूंनी आपल्या ट्वीटमध्ये, ''मनसे हा पक्ष दुर्बलांवरच हल्ले का करतो? जर तुमच्यात हिंमत असेल, तर माझ्याकडे या. माझा दंडूका तुमची वाट पाहात आहे. तुमचा समाचार घेण्यासाठी तो उत्सुक आहे.Why do MNS attack helpless people? If u are brave, come to me. I've a danda waiting for u and is getting impatient https://t.co/0PLECoc4iC
— Markandey Katju (@mkatju) October 19, 2016
MNS people are goondas who have drunk the salt water of the Arabian Sea. I am an Allahabadi goonda, who has drunk the water of the Sangam — Markandey Katju (@mkatju) October 19, 2016काटजूंनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ''मनसेचे कार्यकर्ते गुंड आहेत. त्यांनी आरबी समुद्रातलं खारं पाणीच चाखलं आहे. मी इलाहबादचा गुंड आहे, जो संगमाचं पाणी प्यायला आहे.''
दरम्यान, काटजूंनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन त्यांच्यावरही टीका केली आहे.Of all the crooked politicians of India, Bal Thackeray was perhaps the most brazed in his hooliganism and shamelessness
— Markandey Katju (@mkatju) October 20, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement