(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एप्रिलमध्ये घरगुती एसीची विक्री 17.5 लाख युनिट्सवर पोहोचली, 2022 मध्ये 90 लाख एसी विक्रीचा अंदाज : CEMA
देशातील उष्णतेच्या लाट पाहता मे आणि जूनमध्ये देखील एअर कंडिशनरची मागणी चांगली आहे. एप्रिलमध्ये एक लाखाहून अधिक एसीची विक्री झाली आहे
AC sales : उन्हाळा सुरू झाल्याने घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एअर कंडिशनरची (एसी) मागणी खूप वाढली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये मोठ्या एसी कंपन्यांच्या विक्रीने विक्रमी पातळी गाठली असून हा ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे. व्होल्टास, पॅनासोनिक, हिताची, एलजी आणि हायर या कंपन्यांनी गेल्या महिन्यात 'एसी'च्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदवली आहे.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा एसीच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. मात्र या वर्षी विक्रीच्या आकड्यांमध्ये वाढ झाली आहे. ते म्हणाले की, यावर्षी एप्रिलमध्ये एसीच्या विक्रीने एप्रिल 2019 ची महामारी पूर्व पातळी ओलांडली आहे. एप्रिल, 2022 मध्ये एसी उद्योगाने गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या बाबतीत 'असाधारण' वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षी उष्णतेमुळे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी बेस इफेक्ट आणि कमी बेस इफेक्टमुळे विक्रीत 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे आणि एप्रिलमध्ये एक लाखाहून अधिक एसीची विक्री झाली आहे, असं व्होल्टासचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रदीप बक्षी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
उन्हाळ्याचे लवकर आगमन आणि तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे घरगुती एअर कंडिशनरची मागणी केली आहे. यावर्षी सुमारे 90 लाख युनिट्सच्या विक्रमी विक्रीची अपेक्षा करत आहेत, असे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सांगितले.
ट्रेंडनुसार देशातील उष्णतेच्या लाट पाहता मे आणि जूनमध्ये देखील एअर कंडिशनरची मागणी चांगली असेल, असं सेमाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे. अती तीव्र उन्हाळा पहिल्या चार महिन्यांतील विक्रीच्या ट्रेंडच्या आधारावर, यावर्षी एसी मार्केट 8.5 दशलक्ष ते 9 दशलक्ष युनिट्सच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. जे आतापर्यंत सर्वाधिक असेल असंही त्यांनी सांगितलं
आम्ही एअर कंडिशनरची विक्रमी मागणी पाहता या एप्रिलमध्ये पॅनासोनिक इंडियाने 1,00,000 हून अधिक युनिट्सची विक्री केली. जी गेल्या एप्रिल (2021) च्या तुलनेत 83 टक्क्यांनी वाढली आणि एप्रिल 2019 च्या तुलनेत 67 टक्क्यांनी वाढ झाली. असं पॅनासोनिक इंडियाचे बिझनेस हेड, एअर कंडिशनर्स ग्रुपचे गौरव साह म्हणाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये त्यांची विक्री जवळपास दुप्पट झाली आहे, असं जॉन्सन कंट्रोल्स-हिताची एअर कंडिशनिंग इंडिया कंपनीने म्हटलं आहे.