एक्स्प्लोर
Advertisement
EXCLUSIVE: टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण
एबीपी न्यूजाला मिळालेल्या माहितीनुसार, फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आलं.
मुंबई: मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकलाकडे यूपीए सरकारने कानाडोळा केला की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एबीपी न्यूजाला मिळालेल्या माहितीनुसार, फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आलं. त्यावेळी एस एम कृष्णा परराष्ट्र मंत्री होते, तर पी चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते.
खरं तर टकलाविरोधात 1995 साली इंटरपोलनं रेडकॉर्नर नोटीस बजावली होती, त्यानतंर 2011 साली टकल्याच्या पासपोर्टची मुदत संपली. टकलानं दुबईतून पासपोर्ट नूतनीकरणासाठी त्यानं 7 फेब्रुवारी 2011 ला अर्ज केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या पोसपोर्टचं नूतनीकरण करण्यात आलं.
त्यामुळे एखाद्या प्रमुख आरोपीच्या पासपोर्टचं नूतनीकरण होऊच कसं शकतं असा प्रश्न उपस्थित होतोय.
12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
टकलाला दुबईतून अटक
1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा एकेकाळचा साथीदार फारुख टकला याला दुबईतून काल (गुरुवार) सकाळी मुंबईत आणलं गेलं.
फारुख टकलाविरोधात 1995 साली रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. टकला यानं 1993 साली मुंबईतल्या बॉम्बस्फोटानंतर भारताबाहेर पलायन केलं होतं.
फारुख टकला हा दाऊदचा जवळचा साथीदार होता. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटात त्याची मुख्य भूमिका होती. शस्त्रात्र उतरवणं, बॉम्ब तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सक्रीय सहभाग होता. मुंबईतील स्फोटाच्या काही दिवस आधी तो भारताबाहेर निघून गेला होता.
12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट
12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता.
या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली.
साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.
संबंधित बातम्या
दाऊदचा साथीदार फारुख टकलाला दुबईतून अटक
1993 बॉम्बस्फोटातील दोषींना लवकरच शिक्षा सुनावणार
मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू
1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत आजपासून युक्तीवाद
1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद
12 मार्च, 12 स्फोट: 1993 मध्ये कुठे आणि कसे स्फोट झाले?
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष
1993 मुंबई साखळी स्फोट : कोणावर काय आरोप?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
क्रीडा
पालघर
व्यापार-उद्योग
Advertisement