एक्स्प्लोर

ABP CVoter Survey: मायावती इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून समोर आल्या तर? सर्वेक्षणातून अहवाल समोर

ABP CVoter Survey: कोणत्याही प्रकारच्या युतीमध्ये सामील होणार नसल्याचं मायावती यांनी स्पष्ट केलं आहे. पण काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवड केल्यास मायावती या इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

मुंबई : बीएसपीच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवती (Mayavati) यांनी सोमवार 15 जानेवारी रोजी स्पष्ट केलं की त्या कोणथ्याही प्रकारच्या युतीमध्ये सामील होणार नाही. दरम्यान बीएसपीचे खासदार मलूक नागर यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मायावती इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, इंडिया आघआडीने (I.N.D.I.A Alliance) मायावती यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं. 

या सर्व चर्चा सुरु असतानाच इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण देखील मायावती यांना देण्यात येऊ शकतं, असं म्हटलं जातंय. पण मायावती यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आगामी लोकसभा निवडणुका त्या स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. निवडणुकांनंतर सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला योग्य सहभागासह पाठिंबा दिला जाईल, असं देखील त्यांनी म्हटलं.

दरम्यान, इंडिया आघाडीने मायावती यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार केले असते तर आघाडीला फायदा झाला असता का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी न्यूजच्या सी व्होटरने केला आहे. सर्वेक्षणात 36 टक्के लोकांनी मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले असते तर इंडिया आघाडीला फायदा झाला असता असं म्हटलं. असे केल्याने युतीचा फायदा होत नसल्याचे 42 टक्के लोकांनी सांगितले. त्याच वेळी, 22 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना याबद्दल 'माहित नाही'.

I.N.D.I.A. मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तर आघाडीला फायदा झाला असता का?

स्रोत - सी वोटर 
हो, फायदा झाला असता - 36 टक्के 
नाही, फायदा नसता झाला - 42 टक्के 
माहित नाही - 22 टक्के 

इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार अद्याप जाहीर नाही

इंडिया आघाडीकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाहीये. त्याचप्रमाणे 9 डिसेंबर रोजी आघाडीच्या चौथ्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केले होते.  परंतु काँग्रेस अध्यक्षांनीच त्यास नकार दिला होता. खासदार नसतील तर पंतप्रधानपदावर बोलण्यात काय अर्थ आहे, आधी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता इंडिया आघाडीचा नवा चेहरा कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हेही वाचा : 

ED Arrest Ajay Mittal: 56 हजार कोटींचं प्रकरण; ईडीची मोठी कारवाई, अजय मित्तल यांच्यासह पाच आरोपी अटकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget