एक्स्प्लोर

Jack Dorsey: मोदी सरकारबद्दल खळबळजनक दावा अन् राजकीय वर्तुळातील चर्चेचा विषय, कोण आहेत ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी?

Jack Dorsey: सध्या राजकीय वर्तुळात ज्यांच्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे त्या जॅक डोर्सी यांनी 2015ते 2021 पर्यंत ट्विटरचे सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

Jack Dorsey: ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांच्या एका मुलाखतीच्या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात आरोप - प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं. 'शेतकरी आंदोलनादरम्यान सरकारवर टीका करणाऱ्या अकाऊंटना ब्लॉक करण्याचा दबाव मोदी सरकारकडून करण्यात आला होता', असा खळबळजनक दावा ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे, तर काँग्रेसकडून या दाव्यामुळे सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. 

परंतु हा दावा करणारे जॅक डोर्सी नेमके आहेत तरी कोण हा प्रश्न अनेकांना आता पडला आहे. जॅक डोर्सी हे ट्विटरचे सह-संस्थापक असून त्यांनी 2015 ते 2021 पर्यंत त्यांनी ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीवर हिंडनबर्गने देखील अनेक आरोप केले आहेत. तसेच त्यांनी ट्विटरच्या जबाबदारीनंतर देखील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

कोण आहेत जॅक डोर्सी?

अमेरिकेत 19 नोव्हेंबर 1976 रोजी जॅक डोर्सी यांचा जन्म झाला. त्यांनी 2006 मध्ये डोर्सी यांनी ईवान विल्यम्स सोबत ट्विटर या जगप्रसिद्ध कंपनीची स्थापना केली. तसेच त्यांच्यावर 2015 ते 2021 पर्यंत ट्विटरच्या सीईओ पदाची देखील जबाबदारी होती. जॅक डोर्सी यांनी राजीनामा दिल्यानंतर भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या सीईओ पदाची जबाबदारी सांभाळली. डोर्सी यांनी यूजर्सना मोबाईलवरुन पेमेंट करता यावे यासाठी  Block Inc ची स्थापना केली. कोरोना काळात यावरुन जवळपास 5.1 कोटींचे व्यवहार झाले असल्याचं म्हटलं जात आहे. 

एलॉन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केल्यानंतर ट्विटरला स्पर्धा देण्यासाठी जॅक डोर्सी यांनी BlueSky हे अॅप लाँच केले. हे अॅप ट्विटरप्रमाणेच एक सोशल मीडियाचे माध्यम आहे. सुरुवातीला ब्लूस्काय हा ट्विटर कंपनी अंतर्गत एक प्रकल्प होता. मात्र ट्विटर सोडण्यापूर्वी जॅक डोर्सी यांनी ब्लूस्कायला स्वतंत्र कंपनी म्हणून स्थान दिलं. त्यानंतर त्यांच्या स्केअर या अमेरिकन पेमेंट अॅप असलेल्या कंपनीने ऑस्ट्रेलियन 'आफ्टरपे' या जगप्रसिद्ध कंपनीचा ताबा घेतला. तब्बल 29 अब्ज डॉलर्स इतक्या मोठ्या किंमतीला हा व्यवहार झाला होता. 'स्क्वेअर'चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर जॅक डॉर्सीने यांनीच याबद्दल घोषणा केली होती. 

हिंडेनबर्गचा अहवाल आणि डोर्सी यांच्या अडचणी

हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहानंतर जॅक डोर्सी यांच्या Block Inc या कंपनीवर निशाणा साधला. हिंडनबर्ग रिसर्च फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले होते की, 'Block Inc कंपनीने यूजर्सची संख्या वाढवून दाखवली तर खर्च कमी दाखवला.' हिंडेनबर्गचा हा अहवाल आल्यानंतर डोर्सी यांच्या कंपनीच्या शेअर्सममध्ये देखील जवळपास 18 टक्क्यांनी घसरण झाली होती. त्यावेळी जॅक डोर्सी यांच्या कंपनीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 

याच जॅक डोर्सी यांनी मोदी सरकारच्या विरोधात अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. तर 'डोर्सी यांच्या काळात ट्विटरने भारतीय नियमांचं उल्लंघन केलं' असा आरोप केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केला आहे. त्यामुळे जॉस डोर्सी यांच्या या दाव्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'ट्विटर बंद पाडू, अधिकाऱ्यांच्या घरावर छापे टाकू'; शेतकरी आंदोलनादरम्यान भारत सरकारची धमकी? माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget