एक्स्प्लोर
काँग्रेस खासदारावर सुरक्षारक्षकाने दोन वेळा रायफल रोखली!
कमलनाथ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1980 पासून ते 9 वेळा खासदार म्हणून मध्यप्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत आहेत.
छिंदवाडा (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यावर त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसाने दोन वेळा रायफल रोखल्याची घटना काल घडली. मात्र बाजूलाच असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने रायफल रोखणाऱ्या पोलिसाला बाजूला सारलं आणि मोठा अनर्थ टळला.
राहुल गांधी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्या कार्यक्रमासाठी कमलनाथ मध्यप्रदेशच्या छिंदवाडा विमानतळावरुन दिल्लीला निघाले होते. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने दोन वेळा रायफल ताणली.
कमलनाथ यांच्यावर रायफल रोखणाऱ्या सुरक्षारक्षकाचं नाव रत्नेश पवार असे आहे. यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या अन्य सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं. रत्नेश पवारला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय, त्याला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
कोण आहेत कमलनाथ?
कमलनाथ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1980 पासून ते 9 वेळा खासदार म्हणून मध्यप्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करत आहेत. 16 व्या लोकसभेचे ते अध्यक्ष होते. केंद्रीय नगरविकास मंत्री, वाणिज्य आणि औद्योगिक मंत्री, वस्त्रोद्योग राज्यमंत्री, पर्यावरण आणि वन मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी केंद्रात पार पाडल्या आहेत.
नेहरु-गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणूनही कमलनाथ यांची ओळख आहे. डेहराडूनमधील डून स्कूलमध्ये कमलनाथ हे संजय गांधींचे वर्गमित्र होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement