एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

8th September In History: भूपेन हजारिका, आशा भोसले यांचा जन्मदिन, अफगाणिस्तामध्ये रक्तपातानंतर रशियाची माघार आणि मालेगाव बॉम्बस्फोटात 37 जणांचा मृत्यू

8th September Important Events : अफगाणिस्तानध्ये मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागल्यानंतर सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य माघार घेण्याचा निर्णय घेतला. 

8th September In History : भारताच्या इतिहासासाठी आजचा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचं आहे. आजच्या दिवशी अनेक दखल घेण्यासारख्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये महान संगीतकार भूपेन हजारिका आणि गायिका आशा भोसले यांचा आज जन्मदिन. आपल्या आवाजाने हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांची गणना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन महान गायकांमध्ये केली जाते. 8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशाने हिंदी व्यतिरिक्त मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत.

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 8 सप्टेंबर या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा क्रमवार तपशील पुढीलप्रमाणे,

1320 : गाझी मलिकला सुलतानचा दर्जा मिळाला.

1900 : टेक्सासमधील गॅल्व्हेस्टन येथे चक्रीवादळामुळे 6,000 लोकांचा मृत्यू झाला.

1926 : महान संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांचा जन्मदिन

भूपेन हजारिका (Bhupen Hazarika) हे आसाममधील एक बहुमुखी गीतकार, संगीतकार आणि गायक होते. याशिवाय ते आसामी भाषेतील कवी, चित्रपट निर्माते, लेखक आणि आसामच्या संस्कृती आणि संगीताचे जाणकार होते. स्वत:ची गाणी लिहिणारे, संगीत देणारे आणि गायलेले ते भारतातील एक अद्वितीय कलाकार होते. ते दक्षिण आशियातील महान सांस्कृतिक राजदूतांपैकी एक मानले जातात. कविता लेखन, पत्रकारिता, गायन, चित्रपट निर्मिती अशा अनेक क्षेत्रात त्यांनी काम केले.

भूपेन हजारिका यांच्या गाण्यांनी लाखो हृदयांना स्पर्श केला आहे. हजारिकांच्या दमदार आवाजातील "दिल हूम हूम करे" आणि "ओ गंगा तू बहती है क्यूं" ही गाणी ऐकणारा कोणीही हे नाकारू शकत नाही की भूपेन दादांची जादू त्यांच्या हृदयावर चालली नाही. आपली मूळ भाषा आसामी व्यतिरिक्त, भूपेन हजारिका हिंदी, बांगला यासह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये गाायचे. "गांधी ते हिटलर" या चित्रपटात त्यांनी महात्मा गांधींचे आवडते भजन "वैष्णव जन" गायले. भारत सरकारने 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण देऊन गौरविले. 2019 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला.

1933 : आशा भोसले यांचा जन्म 

हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे झाला. लता मंगेशकर यांच्या धाकटी बहीण आणि दीनानाथ मंगेशकर यांची कन्या आशा यांनी चित्रपट अल्बममधून जवळपास 16 हजार गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाचे चाहते जगभरात पसरले आहेत. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी 1948 मध्ये सावन आया चुनारिया या चित्रपटात पहिले गाणे गायले होते. आशा यांचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संगीत, गझल, पॉप संगीत अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे आणि तितकेच यशही मिळवले आहे

1943: दुसऱ्या महायुद्धादरम्यान इटलीने मित्र राष्ट्रांशी बिनशर्त युद्धविराम करार केला.

1960 : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी यांचे निधन

एक स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि राजकारणी अशी ओळख असलेल्या फिरोज गांधी (Feroze Gandhi) यांचे 8 सप्टेंबर 1960 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते पती होते. फिरोज गांधी यांनी देशातल्या भ्रष्टाचारावर आवाज उठवला. स्वतंत्र भारतातील पहिला मोठा घोटाळा त्यांनी उघडकीस आणला आणि त्यामुळे देशाचे तत्कालीन अर्थमंत्री आणि नेहरूंचे खास मित्र टीटी कृष्णमाचारी यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.  

1962- चीनची भारताच्या पूर्व सीमेवर घुसखोरी 

'हिंदी चीनी भाई-भाई' असा नारा देणाऱ्या चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला. 8 सप्टेंबर 1962 रोजी चीनेने भारताच्या पूर्व सीमेवर घुसखोरी केली. 

1966- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 

जगभरात शिक्षणाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिवस (International Literacy Day) म्हणून साजरा करण्याचं जाहीर केलं. 8 सप्टेंबर 1966 या दिवशी पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला. साक्षरता हा मानवाधिकार असून तो प्रत्येकाला मिळावा हा उद्देश यामागे आहे. 

1974- वॉटरगेट प्रकरणी रिचर्ड निक्सन यांना माफी

अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणी तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना माफी देण्यात आली. निक्सन यांच्यानंतर सत्तेत आलेल्या राष्ट्रपती गेरॉल्ड फोर्ड यांनी ही माफी दिली. 

1982- शेख मोहम्मद अब्दुल्ला यांचे निधन

प्रसिद्ध राजकारणी शेख अब्दुल्ला (Sheikh Abdullah) हे शेर-ए-कश्मीर म्हणून ओळखले जायचे. त्यांनी भारताच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली. शेख अब्दुल्ला यांनी ऑल जम्मू अॅन्ड काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सची स्थापना केली. जम्मू काश्मीर संस्थानाचे ते पहिले निवडून आलेले पंतप्रधान होते. नंतरच्या काळात जम्मू काश्मीर भारतात विलिन झाल्यानंतर ते जम्मूचे मुख्यमंत्री बनले. 

1988- अफगानिस्तानमधून रशियाच्या माघारीला सुरुवात

शीतयुद्धकालात अमेरिका आणि रशिया या दोन देशांदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला होता. अफगाणिस्तान हा अमेरिकेच्या भांडवलवादी गटातील सहकारी होता. त्यामुळे शेजारच्या रशियाने अफगाणिस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यावर आक्रमण केलं. पण अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना शस्त्रांचा पुरवठा केला आणि रशियाविरोधात आव्हान निर्माण केलं. त्यामुळे रशियाची मोठी नाचक्की झाली आणि रशियाला मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं. त्यानंतर रशियाने 8 सप्टेंबरपासून अफगाणिस्तानमधून सैन्य माघारीला सुरुवात केली. 

2006- मालेगावात बॉंबस्फोट, 37 जणांचा मृत्यू 

2006 महाराष्ट्रातील मालेगाव या ठिकाणी सिरियल बॉंब ब्लास्ट (Malegaon Bomb Blast ) झाले होते. यामध्ये 37 लोकांचा मृत्यू झाला तर 100 हून अधिक लोक जखमी झाले. नंतरच्या काळात या स्फोटामागे काही हिंदुत्ववादी संघटना असल्याचं तपासातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र एटीएसकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. नंतरच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Embed widget