एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीरमध्ये रोप वेची केबल तुटली, 7 पर्यटकांचा मृत्यू
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील प्रसिद्ध स्काय रिसॉर्ट गुलमर्गमध्ये रोपवेचा केबल तुटून मोठी दुर्घटना घडली. रोप वेचा वायर तुटून कार केबिन कोसळल्याने सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत स्थायिक असलेल्या नागपुरातील अंद्रासकर कुटुंबाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.
गुलमर्ग-गोंदोला रोप वेवर झाड पडल्याने केबिन खाली कोसळली. हवेचा वेग जास्त असल्याने झाड कोसळलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतांपैकी चार जण एकाच कुटुंबातील आहेत.
मुळचे नागपुरचे रहिवासी असणाऱ्या अंद्रासकर कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयंत अंद्रासकर, त्यांची पत्नी मानसी, मुलगी जान्हवी आणि अनघा अशी मृतांची नावं आहेत. सध्या अंद्रासकर कुटुंब दिल्लीच्या शालीमार बाग परिसरात वास्तव्याला होतं. पर्यटनासाठी ते काश्मीरच्या गुलमर्गमध्ये गेले होते.
केबल तुटल्याने कार केबिन शेकडो मीटर खाली कोसळली. यामध्ये पर्यटकांसोबतच खाली असलेल्या दोन स्थानिकांचाही मृत्यू झाला.
गुलमर्ग केबल कार
गुलमर्ग केबल कार दोन टप्प्यांमध्ये पर्यटकांना समुद्रसपाटीपासून 13 हजार 780 फूट उंचीवर घेऊन जाते. ही जगातील दुसरी सर्वात उंच केबल कार सेवा आहे. ज्याची प्रवासी क्षमता 600 जणांची आहे.
या रोप वे अंतर्गत एकूण 36 केबल कार चालवल्या जातात. रोप वेच्या मार्गात एकूण 18 टॉवर आहेत. जम्मू काश्मीर सरकार आणि एका खाजगी कंपनीचा हा प्रकल्प आहे. जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या आकर्षणाचं प्रमुख केंद्र म्हणून या रोप वेकडे पाहण्यात येतं.
पहिल्या टप्प्यात प्रवाशांना गुलमर्ग रिसॉर्टपासून 2600 मीटर उंचीवर कोंगडोरी स्टेशनला नेलं जातं. तर दुसऱ्या टप्प्यात कोंगडोरी पासून 3 हजार 747 मीटर उंचीचा प्रवास केला जातो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement